news
Home अमरावती १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह; लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश

१ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह; लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश

कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया वापराबाबत काळजी घेण्याचा सल्ला; आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या कार्याचे विभागीय आयुक्तांकडून कौतुक | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

“संवेदनशीलता आणि शिस्तीतून लोकाभिमुख प्रशासन घडवा” — विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे आवाहन!

अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. २ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

अमरावती: महसूल विभाग हा संपूर्ण शासनाचा कणा आणि मुख्य चेहरा आहे. सामान्य जनता शासनाचे प्रतिनिधी म्हणून महसूल प्रशासनाकडे पाहते. त्यामुळे या विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या वर्तनात शिस्त, संवेदनशीलता आणि सहानुभूती आणून लोकाभिमुख प्रशासन घडवावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले.

१ ऑगस्ट ‘महसूल दिना’निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान साजऱ्या होणाऱ्या महसूल सप्ताहाच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा  सुरज वाघमारे (अपर आयुक्त – से.नि.), संतोष आठरे (तहसीलदार), मधुकर धुळे (नायब तहसीलदार), संतोष चव्हाण (निम्नश्रेणी लघुलेखक), उषा गवई (अव्वल कारकून), शशिकांत पाचघरे (महसूल सहाय्यक), संतोष चव्हाण (वाहन चालक), श्रीमती माया राजवाडे (शिपाई) विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विभागातील विविध जिल्ह्यांतील  अमरावती: गोविंद दाणेज (अपर जिल्हाधिकारी), अरुण कुकडे (सहा. महसूल अधि.), आकाश वानखडे (शिपाई), अकोला: शरद जावळे (उपविभागीय अधिकारी), कु. वर्षा ठाकरे (सहा. महसूल अधि.), अमरावती (चिखलदरा): जीवन मोराणकर (तहसीलदार), वाशिम: अनिल वाडेकर (नायब तहसीलदार), चंद्रशेखर मनवर (मंडळ अधिकारी), शैलेश घोगरे (ग्राम महसूल अधि.), सौ. छायाबाई डहाके (पोलीस पाटील), यवतमाळ: श्रीमती विद्या गोमासे (लघुलेखक), श्रीमती अश्विनी फाटे (महसूल सहाय्यक), अतुल टाके (वाहनचालक), छत्रपती मडावी (महसूल सेवक) सत्कारमूर्ती उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे यांनी महसूल कर्मचाऱ्यांना सोशल मीडियाच्या वापराबद्दल महत्त्वाचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या:

“महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांचा (Social Media) वापर करताना अत्यंत काळजी घ्यावी. आपल्या कोणत्याही कृत्याने अथवा वक्तव्याने शासनाची प्रतिमा डागाळणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता बाळगावी.”

तसेच ‘एल निनो’मुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी आणि आपत्तीच्या काळात जिवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथकांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमास निवृत्त अपर आयुक्त सुरज वाघमारे, अपर आयुक्त संजय जाधव, अपर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह विभागातील अधिकारी, कर्मचारी व पुरस्कारार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!