लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा आदर्श घेऊन मातंग समाजाने शैक्षणिक प्रगती करावी: ॲड. राजूभाऊ कलाने
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: जगविख्यात साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती ही केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही अत्यंत आदराने व उत्साहात साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर जुनी वस्ती, बडनेरा येथे मातंग समाजातील जागरूक युवकांच्या पुढाकाराने प्रथमच लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून युवा सामाजिक कार्यकर्ते ॲड. राजूभाऊ कलाने उपस्थित होते. तर विशेष निमंत्रक पाहुणे म्हणून मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष निलेशभाऊ खडसे, ॲड. शुभम खजोने आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते साहेबराव लोखंडे प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात बोलताना ॲड. राजूभाऊ कलाने यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले:
“लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लोकनाट्य, पोवाडे आणि विविध कादंबऱ्यांच्या माध्यमातून दलित, पीडित व कष्टकरी कामगारांच्या व्यथा मांडल्या. मातंग समाज बांधवांनी अण्णाभाऊंच्या संघर्षाचा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल केली पाहिजे.”
विशेष निमंत्रक पाहुणे निलेशभाऊ खडसे यांनी मातंग समाजाला मुक्ता साळवे यांचा शैक्षणिक वारसा पुढे नेण्याचे आणि शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी सुनील भोकरे, मंगल इंगोले, संदीप भोकरे, अंकुश भोकरे, सुरेश भोकरे, अर्जुन इंगोले, करण इंगोले, अमोल भोकरे, लड्डूजी खंडारे, देविदास भोकरे, रघुनाथ भोकरे, मारोतराव भोकरे, राजेश भोकरे, मंगेश भोकरे, किरण भोकरे, ऋषिकेश भोकरे, अजय भोकरे, संतोष भोकरे, योगेश चांदणे, रोहित भोकरे, शैलेश भोकरे, प्रेम भोकरे, कार्तिक भोकरे, योगीराज भोकरे, आदित्य थोरात, वेदांत इंगोले, मंगेश भोकरे, महेंद्र खडसे, जय मोरे, महेश इंगोले, प्रसेनजित प्रधान हे प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच महिला मंडळातून प्रतिभा भोकरे, मालू उर्फ बाली इंगोले, वंदना इंगोले, प्रेमीला रमेश भोकरे, प्रेमीला सुनील भोकरे, अरुणा भोकरे, रिता भोकरे, सारिका भोकरे, कोमल खडसे, संध्या भोकरे, लक्ष्मी खडसे, पंचांबाई भोकरे, ललिता बाई भोकरे, मीना बाई भोकरे, मीना भोकरे, शोभा बाई भोकरे, सुरेखा बाजड, दर्शना भोकरे, नंदा बाई लोखंडे, वेदिका लोखंडे, सुमनबाई खडसे, विद्याबाई मोरे, प्रतीक्षा मोरे, अश्विनी इंगोले व छकुली प्रधान आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या जयंती उत्सव कार्यक्रमाचे नेटके आयोजन अर्जुन इंगोले, अमोल भोकरे, कैलास भोकरे, महादेव इंगोले व करण इंगोले यांनी केले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

