news
Home पिंपरी चिंचवड ‘अंमली पदार्थ मुक्त पिंपरी-चिंचवड’साठी पोलिसांचे पाऊल; परिमंडळ-१ च्या वतीने प्राचार्यांसह शिक्षकांनी घेतली व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ!

‘अंमली पदार्थ मुक्त पिंपरी-चिंचवड’साठी पोलिसांचे पाऊल; परिमंडळ-१ च्या वतीने प्राचार्यांसह शिक्षकांनी घेतली व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ!

डीसीपी संदिप आटोळे व एसीपी मनीषा कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती; विद्यार्थ्यांपर्यंत जनजागृती पोहोचवण्याचा निर्धार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

तरुणाईला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा उपक्रम; डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये शाळा-कॉलेजांच्या प्राचार्यांसाठी ‘अंमली पदार्थ विरोधी जनजागृती’ कार्यक्रम संपन्न!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी आणि शाळा-कॉलेजांच्या आवारात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ च्या वतीने गुरुवारी (दि. २७) विशेष ‘अंमली पदार्थ विरोधी जनजागृती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत तुकारामनगर येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये दुपारी १२ ते २ या वेळेत हा कार्यक्रम पार पडला.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड आणि अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली यांच्या विशेष सूचनेनुसार या जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमादरम्यान उपस्थित शाळा व कॉलेजच्या प्राचार्यांना, मुख्याध्यापकांना तसेच शिक्षकांना व्यसनाधीनतेची लक्षणे कशी ओळखावीत आणि विद्यार्थ्यांना यापासून कसे दूर ठेवावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात  तज्ज्ञ मार्गदर्शक विल्यम साळवे , अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील , परिमंडळ-१ चे पोलीस उप-आयुक्त संदिप आटोळे , सांगवी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त मनीषा कदम , पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर (दापोडी) चे शिक्षक मिलिंद संधान, मॉडर्न कॉलेज (निगडी) चे डॉ. सत्यवान कुंभार आणि सरस्वती विद्यालय (आकुर्डी) च्या शिक्षिका मोहिनी अनेकर यांनी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती संदर्भात आपली मते मांडली.

या कार्यक्रमाला परिमंडळ-१ च्या कार्यक्षेत्रातील शाळा व कॉलेजचे सुमारे १७० ते १८० प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व शिक्षक व अधिकाऱ्यांनी सामूहिकरीत्या व्यसनमुक्तीची शपथ ग्रहण केली.

पोलीस उप-आयुक्त संदिप आटोळे, एसीपी मनीषा कदम, एसीपी प्रशांत ढोले यांच्यासह निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, चिंचवडचे वपोनि दत्तात्रय चासकर, पिंपरीच्या वपोनि रुपाली बोबडे, संत तुकाराम नगरचे वपोनि सुहास आव्हाड, दापोडीचे वपोनि गोरख कुंभार आणि सांगवीचे वपोनि जितेंद्र कोळी हे सर्व अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!