news
‘प्रभागातील विकासकामे ही कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष रस्त्यावर’; बापू काटे यांच्या आक्रमक नेतृत्वामुळे जंगल कोकणे रोडचे काम वेगाने सुरू!‘शक्ती कायदा’ त्वरित लागू करा अन् महिलांवरील अत्याचारांना आळा घाला; दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाचे मुख्यमंत्र्यांना साकडे!‘कुटुंबापलिकडे जाऊन समाजाचे रक्षण करणाऱ्यांना कृतज्ञतेचा सलाम’; पिंपरीत चिमुकल्या विद्यार्थिनींनी जपली सामाजिक बांधिलकी!ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर रंगला सुनील पोकरे यांचा वाढदिवस सोहळा; ‘मॅक्स मंथन न्यूज’च्या माध्यमातून लोकप्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार!‘नृत्योपासना’ नृत्यालयातून कला अन् संस्कृतीचा जागर; ४० हून अधिक बालकलाकारांनी जिंकली रसिकांची मनं!
Home पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर रंगला सुनील पोकरे यांचा वाढदिवस सोहळा; ‘मॅक्स मंथन न्यूज’च्या माध्यमातून लोकप्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार!

ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर रंगला सुनील पोकरे यांचा वाढदिवस सोहळा; ‘मॅक्स मंथन न्यूज’च्या माध्यमातून लोकप्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार!

मुरलीधर दळवी व सूर्यकांत फकटकर यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा; सांगवी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मॅक्स मंथन न्यूजच्या पिंपरी-चिंचवड पत्रकारपदी निवड झाल्याबद्दल सुनील पोकरे यांचा नागरी सत्कार; ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर रंगला सोहळा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी सुनील पोकरे, दि. २८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

सांगवी / पिंपरी: मॅक्स मंथन न्यूजची सुरुवात १४ एप्रिल २०२४ रोजी झाली असून, अल्पावधीतच या न्यूज चॅनेलने अत्यंत लोकप्रियता मिळवली आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडण्याचे कार्य मॅक्स मंथन न्यूज करत आहे. सत्य, निष्पक्षता आणि सामाजिक बांधिलकी जपत प्रशासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून ही वृत्तवाहिनी प्रभावी भूमिका बजावत आहे. मराठीतील विश्वसनीय आणि सत्य बातम्या जनतेपर्यंत पोहोचवणे हा मॅक्स मंथन न्यूजचा मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड येथील पत्रकारपदी नुकतीच निवड झालेले सामाजिक कार्यकर्ते सुनील पोकरे यांनी केले.
सांगवी येथील संत गजानन महाराज मंदिरासमोरील ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर सुनील पोकरे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी पत्रकारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर दळवी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना मुरलीधर दळवी म्हणाले की, सुनील पोकरे यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत आणि गरिबीचा सामना करत आपले शिक्षण पूर्ण केले आहे. संसार, नोकरी आणि सामाजिक कार्याची जबाबदारी सांभाळत, वेळप्रसंगी रात्रीच्या महाविद्यालयात (Night College) शिक्षण घेऊन त्यांनी आपली शैक्षणिक प्रगती साधली. त्यांच्या या संघर्षातून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे.”
तसेच सोनार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत फकटकर यांनी सुनील पोकरे यांना वाढदिवसाच्या स्नेहमयी शुभेच्छा देत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर दळवीसूर्यकांत फकटकर यांनी केले होते. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक नाटकें, सांडभोर, पिंपळे, मांढरे, गोसावी, जगताप, अशोकराव भोसले यांच्यासह सांगवी परिसरातील इतर नागरिक व ज्येष्ठ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी सुनील पोकरे यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!