news
‘प्रभागातील विकासकामे ही कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष रस्त्यावर’; बापू काटे यांच्या आक्रमक नेतृत्वामुळे जंगल कोकणे रोडचे काम वेगाने सुरू!‘शक्ती कायदा’ त्वरित लागू करा अन् महिलांवरील अत्याचारांना आळा घाला; दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाचे मुख्यमंत्र्यांना साकडे!‘कुटुंबापलिकडे जाऊन समाजाचे रक्षण करणाऱ्यांना कृतज्ञतेचा सलाम’; पिंपरीत चिमुकल्या विद्यार्थिनींनी जपली सामाजिक बांधिलकी!ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर रंगला सुनील पोकरे यांचा वाढदिवस सोहळा; ‘मॅक्स मंथन न्यूज’च्या माध्यमातून लोकप्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार!‘नृत्योपासना’ नृत्यालयातून कला अन् संस्कृतीचा जागर; ४० हून अधिक बालकलाकारांनी जिंकली रसिकांची मनं!
Home पिंपरी चिंचवड ‘कुटुंबापलिकडे जाऊन समाजाचे रक्षण करणाऱ्यांना कृतज्ञतेचा सलाम’; पिंपरीत चिमुकल्या विद्यार्थिनींनी जपली सामाजिक बांधिलकी!

‘कुटुंबापलिकडे जाऊन समाजाचे रक्षण करणाऱ्यांना कृतज्ञतेचा सलाम’; पिंपरीत चिमुकल्या विद्यार्थिनींनी जपली सामाजिक बांधिलकी!

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम व पोलीस कर्मचाऱ्यांशी साधला मनमोकळा संवाद; 'इनाव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल'च्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आपुलकीच्या धाग्याने जोडले सेवा आणि सुरक्षेचे बंध; चिखलीच्या इनाव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थिनींनी पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकारी, सुरक्षा रक्षक व पोलिसांना बांधल्या राख्या!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा सण नव्हे, तर एकमेकांच्या सुख-दुःखात सोबत राहण्याची आणि सुरक्षेची भावना जपणारा पवित्र उत्सव आहे. याच भावनेला सामाजिक कृतज्ञतेची जोड देत चिखली येथील ‘इनाव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल’च्या विद्यार्थिनींनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अतिशय अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा साजरा केला.
शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेले महापालिका अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विद्यार्थिनींनीराख्या बांधून आपुलकी, सन्मान आणि कृतज्ञतेचा अनोखा संदेश दिला.

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या या प्रेरणादायी कार्यक्रमात विद्यार्थिनींनी नगरसदस्य विकास साने, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि विशेष अधिकारी किरण गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना राखी बांधली व औक्षण केले.
यावेळी केवळ अधिकारीच नव्हे, तर महापालिका परिसराची अहोरात्र सुरक्षा सांभाळणारे सुरक्षा रक्षक तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी झटणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही विद्यार्थिनींनी राखी बांधून त्यांच्या कर्तव्यदक्षतेला कृतज्ञतापूर्वक सलाम केला.

राखी बांधल्यानंतर विद्यार्थिनींनी अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. रक्षाबंधनाचा सण कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता शहरासाठी आणि समाजासाठी रात्रगस्ती झटणाऱ्या व्यक्तींप्रती आदर व्यक्त करण्याची संधी म्हणून या उपक्रमाकडे पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या सणाचे महत्त्व आणि परस्पर रक्षणाची भावना अधोरेखित करणारी सुंदर गीते सादर केली. त्यांच्या निरागस स्वरांनी आणि उत्साहाने महापालिका परिसरातील वातावरण अत्यंत प्रसन्न आणि भारावून टाकले होते.

लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा रुजाव्यात, कृतज्ञता व्यक्त करण्याची संस्कृती निर्माण व्हावी आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या घटकांप्रती आदरभाव राहावा, या मुख्य उद्देशातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुटुंबातील नात्यांना जोडणारा रक्षाबंधनाचा धागा समाजातील सेवाभावी घटकांशी जोडत विद्यार्थ्यांनी या सणाला एक व्यापक आणि सुसंस्कृत सामाजिक आयाम दिला आहे. शाळेच्या या आगळ्यावेगळ्या आणि कौतुकास्पद उपक्रमाबद्दल महापालिकेचे अधिकारी, पोलीस दल आणि नागरिकांच्या वतीने विद्यार्थिनींचे व शाळेच्या व्यवस्थापनाचे जोरदार कौतुक करण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!