news
‘प्रभागातील विकासकामे ही कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष रस्त्यावर’; बापू काटे यांच्या आक्रमक नेतृत्वामुळे जंगल कोकणे रोडचे काम वेगाने सुरू!‘शक्ती कायदा’ त्वरित लागू करा अन् महिलांवरील अत्याचारांना आळा घाला; दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाचे मुख्यमंत्र्यांना साकडे!‘कुटुंबापलिकडे जाऊन समाजाचे रक्षण करणाऱ्यांना कृतज्ञतेचा सलाम’; पिंपरीत चिमुकल्या विद्यार्थिनींनी जपली सामाजिक बांधिलकी!ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर रंगला सुनील पोकरे यांचा वाढदिवस सोहळा; ‘मॅक्स मंथन न्यूज’च्या माध्यमातून लोकप्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार!‘नृत्योपासना’ नृत्यालयातून कला अन् संस्कृतीचा जागर; ४० हून अधिक बालकलाकारांनी जिंकली रसिकांची मनं!
Home पिंपरी चिंचवड ‘प्रभागातील विकासकामे ही कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष रस्त्यावर’; बापू काटे यांच्या आक्रमक नेतृत्वामुळे जंगल कोकणे रोडचे काम वेगाने सुरू!

‘प्रभागातील विकासकामे ही कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष रस्त्यावर’; बापू काटे यांच्या आक्रमक नेतृत्वामुळे जंगल कोकणे रोडचे काम वेगाने सुरू!

नगरसेविकाअनिताताई काटे व नगरसेविका कुंदाताई भिसे यांच्यासह प्रशासनाची उपस्थिती; स्थानिक रहिवाशांच्या अडचणींवर थेट घटनास्थळी तोडगा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

जंगल कोकणे रोडच्या कामाची पाहणी; नागरिकांच्या समस्या निवारत काम वेगाने पूर्ण करण्याचा भाजप शहराध्यक्ष बापू काटे यांचा ठाम निर्धार!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपळे सौदागर / पिंपरी: पिंपळे सौदागर परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जंगल कोकणे रोडचे काम दर्जेदार व लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना वाहतूक कोंडीतून कायमचा दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांनी कंबर कसली आहे. या रस्त्यावरील प्रलंबित नागरी समस्या सोडवून कामाला गती देण्याच्या दृष्टीने त्यांनी आज (दि. २८) प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामाची पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यादरम्यान भाजप शहराध्यक्ष बापू काटे, सहकाऱ्या नगरसेविका अनिताताई संदीप काटे, नगरसेविका कुंदाताई संजय भिसे तसेच महापालिकेचे संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी व अभियंता उपस्थित होते.

पाहणीदरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणासह, ड्रेनेज लाईन, फुटपाथ आणि डांबरीकरण-सिमेंटकरणाशी संबंधित सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रस्त्याच्या कामादरम्यान स्थानिक नागरिकांना व दुकानदारांना येणाऱ्या अडचणी त्यांनी प्रत्यक्षात समजून घेतल्या. नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्याबाबत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली व कामाचा दर्जा उत्तम राखत ते वेळेत पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले.

पिंपळे सौदागर परिसराचा चेहरामोहरा बदलण्यात आणि येथील नागरिकांना जागतिक दर्जाच्या नागरी सुविधा पुरवण्यात भाजप शहराध्यक्ष बापू काटे यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. प्रभागातील कोणतीही समस्या असो, कागदावर न राहता ती प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सोडवण्याची त्यांची कार्यशैली ही जनसामान्यांमध्ये मनापासून कौतुकाचा विषय ठरत आहे. “नागरिकांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विकासकामे दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असा विश्वास बापू काटे यांनी व्यक्त केला.

जंगल कोकणे रोड हे पिंपळे सौदागरमधील अत्यंत मुख्य दळणवळणाचे केंद्र आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील दैनंदिन वाहतूक कोंडीची समस्या संपुष्टात येईल आणि नागरिक, नोकरदार तसेच वाहनचालकांना अतिशय सुखकर व सुरक्षित वाहतुकीचा अनुभव मिळणार आहे. बापू काटे यांच्या या धडाडीच्या पुढाकाराबद्दल परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!