news
Home पिंपरी चिंचवड ‘नागरिकांचा प्रवास सुरक्षित अन् सुकर करणे हेच मुख्य ध्येय’; नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन प्रभागातील समस्यांवर थेट रस्त्यावर!

‘नागरिकांचा प्रवास सुरक्षित अन् सुकर करणे हेच मुख्य ध्येय’; नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन प्रभागातील समस्यांवर थेट रस्त्यावर!

महापालिकेच्या स्थापत्य विभागाला सोबत घेऊन 'कोल्ड मिक्स'ने खड्डे बुजवले; तत्परतेमुळे रहाटणी परिसरातील नागरिकांतून समाधान | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

खड्डेमुक्त रहाटणी – तापकीर नगर प्रभागासाठी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन थेट रस्त्यावर; आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली खड्डे बुजविण्याची जोरदार मोहीम सुरू!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ३० ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

रहाटणी / पिंपरी: पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे नागरिक, महिला वर्ग, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच धर्मवीर संभाजी महाराज उद्यानात जाणाऱ्या भक्तांना व पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांची ही समस्या अत्यंत गांभीर्याने घेत चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांनी स्वतः रस्त्यावर उतरून प्रभागातील खड्डे बुजविण्याच्या मोहिमेला मोठी गती दिली आहे.
जनसामान्यांच्या अडीअडचणींना तात्काळ धावून जाणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळख असलेल्या नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या या थेट धडाडीच्या कारवाईमुळे रहाटणी व तापकीर नगर परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष सोबत घेऊन प्रभागातील विविध मुख्य व अंतर्गत रस्त्यांची पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी धोकादायक ठरत असलेले खड्डे स्वतः अधिकाऱ्यांना दाखवून दिले आणि स्वतः तिथे उपस्थित राहून ‘कोल्ड मिक्स’ पद्धतीचा वापर करून खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करून घेतले. या परिसरातील रस्ते झाले खड्डेमुक्त  नखाते चौकाकडून एस.एन.बी.पी. (SNBP) शाळेकडे जाणारा मुख्य रस्ता,  शिवराजनगर मुख्य रस्ता,  दयाल हाईट्स व रॉयल मॅजेस्टिक सोसायटीसमोरील रस्ता,  आदिनाथ कॉलनी परिसरातील अंतर्गत रस्ते

प्रभागातील नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर व्हावा यालाच आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन म्हणाले, “पावसाळ्यात खड्ड्यांमुळे होणारे अपघात रोखणे आणि वाहनचालकांची गैरसोय दूर करणे हे आमचे कर्तव्य आहे. प्रभागातील उर्वरित सर्व लहान-मोठे खड्डे टप्प्याटप्प्याने तातडीने बुजवले जातील.”
या पाहणी व खड्डे बुजविण्याच्या मोहिमेदरम्यान महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग स्थापत्य विभागाच्या कनिष्ठ अभियंता आश्लेषा सानप, सामाजिक कार्यकर्ते संजय भोसले आणि एकनाथ मंजाळ उपस्थित होते. जनसेवेसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या बाबासाहेब त्रिभुवन यांच्या या कार्यतत्परतेमुळे परिसरात त्यांची जनसेवेची प्रतिमा अधिक उजळली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!