26
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवेतून माहे ऑगस्ट २०२६ अखेर ३८ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त; महापालिकेकडून सन्मानपत्र देऊन गौरव!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०१ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: “महापालिकेच्या सेवेत अनेक वर्षे प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा आणि त्यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची आठवण महापालिकेस सदैव राहील. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी, निरोगी आणि समाधानाचे जावो,” असे प्रतिपादन उप आयुक्त संदीप खोत यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेतून ऑगस्ट २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या २८ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या १० अशा एकूण ३८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार व निरोप समारंभ संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे उत्साहात पार पडला. त्या प्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना उप आयुक्त संदीप खोत बोलत होते.

या प्रसंगी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेसाठी उप आयुक्त संदीप खोत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा सुप्रिया सुरगुडे, महादेव बोत्रे, तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी आणि सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त (२८ कर्मचारी) कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, उपअभियंता सुरेखा कुलकर्णी, लघुलेखक विजयश्री देसाई, मुख्याध्यापिका सविता पवार, प्रमिला जाधव, प्रतिभा वलटे, सुजाता कर्जतकर, विद्या कातोरे, सुनिता गिते, कार्यालय अधीक्षक संजय गरगरे, लेखापाल सुचेता कुलकर्णी, रविंद्र बोऱ्हाडे, मुख्य आरोग्य निरीक्षक सुनील वाटाडे, सिस्टर इनचार्ज निशिगंधा अमोलिक, पुष्पा लाड, क्रीडा शिक्षक शिवाजी मुटकुळे, उपशिक्षिका सुनंदा बोरसे, संजीवनी चौधरी, रखवालदार सुभाष जाधव, आया प्रतिभा निघुट, लिफ्टमन संजय दर्शले, मजूर रविंद्र बोधे, सुशील गडेकर, शिवाजी जगताप, किशोर बारला, उत्तम कलाल, राजू साठे, आणि संजय सावंत.
स्वेच्छानिवृत्ती घेतलेले (१० कर्मचारी) ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र मंडपे, उप अभियंता सत्वशील शितोळे, दूरध्वनी चालक राजश्री गायकवाड, प्लंबर रोहिदास जमदाडे, मजूर संजू साळवे, स्प्रे-कुली दत्तात्रय ढगे, सफाई कामगार सुभाष गायकवाड, रामदास तळपे, पांडुरंग झांजरे, सिताराम लांडे. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले, सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्य लिपिक माया वाकडे यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
