28
चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी (३ सप्टेंबर) पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ परिसराचा पाणीपुरवठा बंद!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०१ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या २०० द.ल.ली. (MLD) क्षमतेच्या प्रकल्पाकरिता उच्चदाब वीज केबल प्रणालीत जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवार, दि. ०३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत शहरातील विविध भागांमधील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
गुरुवारी दिवसभर पुढील भागांमधील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. बोऱ्हाडेवाडी, इंद्रायणीनगर, सेक्टर ४, ६, ९, ११ व १२, शीवरस्ता, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, चोविसावाडी व लगतचा परिसर.
गुरुवारी उच्चदाब वीजपुरवठा बंद ठेवून केबल जोडणीचे काम पूर्ण केल्यानंतर, शुक्रवार दि. ०४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी होणारा पाणीपुरवठा हा अनियमित आणि कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.
कामगारांच्या व यंत्रणेच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे तांत्रिक काम करणे अत्यंत आवश्यक असल्याने, बाधित परिसरातील नागरिकांनी गुरुवारी आधीच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
