news
शिक्षण, कला अन् समाजकारणातील योगदानाबद्दल कल्पना क्षीरसागर यांचा पिंपरी-चिंचवड मनपालिकेत भव्य सत्कार!‘नागरिकहित अन् शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय’; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!पिंपरी महापालिकेकडून ‘माझी वसुंधरा ७.०’ अंतर्गत विशेष मोहीम; कचरा वर्गीकरणासाठी पथनाट्यांद्वारे प्रभावी प्रबोधन!‘कामगारांचा बळी घेणारी व्यवस्था खपवून घेणार नाही’; चिंचवडमधील ५ कामगारांच्या गुदमरून झालेल्या मृत्यूवर काशिनाथ नखाते आक्रमक!‘श्रमिकांच्या तळहातावर तरलाय शहराचा विकास’; हिंद रत्न कामगार पुरस्कार सोहळ्यात महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड पोलीस-नागरिक सलोखा अन् आपुलकीचे अनोखे उदाहरण; सांगवीत ज्येष्ठ भगिनींनी पोलीस बांधवांप्रती व्यक्त केली कृतज्ञता!

पोलीस-नागरिक सलोखा अन् आपुलकीचे अनोखे उदाहरण; सांगवीत ज्येष्ठ भगिनींनी पोलीस बांधवांप्रती व्यक्त केली कृतज्ञता!

विश्वासाचे अन् स्नेहाचे नाते अधिक दृढ करणारा उपक्रम; सांगवी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

ज्येष्ठ भगिनींनी बांधल्या सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस बंधूंना राख्या; पोलीस आणि नागरिकांमधील आपुलकीचे व विश्वासाचे नाते दृढ!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

सांगवी / पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आणि नागरिक यांच्यात नेहमीच अत्यंत चांगला आणि सलोख्याचा संवाद राहिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी २४ तास तत्परतेने कार्यरत असतात. पोलीस आणि नागरिक यांच्यातील हेच स्नेहाचे व विश्वासाचे हितसंबंध अधिक दृढ करणारा उपक्रम सांगवी येथे पाहायला मिळाला.
रक्षाबंधनाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघ, सांगवी परिसर यांच्या वतीने सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधण्याचा एक अत्यंत भावूक व आदरयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला.

सर्वप्रथम ज्येष्ठ भगिनींनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांचे औक्षण करून त्यांना औक्षण केले आणि प्रेमाची राखी बांधली. ऊन, पाऊस, थंडी व सण-उत्सवांची तमा न बाळगता अहोरात्र नागरिकांच्या संरक्षणासाठी सीमेसारखे ठाम उभे राहणाऱ्या पोलीस बांधवांच्या सेवेप्रति या वेळी मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे, आपुलकीचे व सुरक्षिततेचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण या माध्यमातून एका अनोख्या आणि सामाजिक सामाजिक जाणीवेतून साजरा करण्यात आला.

पोलीस आणि जनता यांच्यातील अंतर कमी होऊन परस्परांप्रती विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सांगवी पोलिसांच्या वतीने उपस्थित सर्व ज्येष्ठांचे आदरातिथ्य करत चहाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला प्रतिनिधी अनिता गाढवे, कल्पना देवगावकर, वैशाली कदम, सुमन शिर्के, अलका खोपडे, लतिका जगताप व शकुंतला चौधरी यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले. या वेळी संघाचे अध्यक्ष कमलाकर जाधव, सचिव सुरेंद्र शेळके, कोषाध्यक्ष शिवाजी बंडगर व सदस्य सुनील पोकरे यांच्यासह सांगवी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!