news
शिक्षण, कला अन् समाजकारणातील योगदानाबद्दल कल्पना क्षीरसागर यांचा पिंपरी-चिंचवड मनपालिकेत भव्य सत्कार!‘नागरिकहित अन् शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय’; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!पिंपरी महापालिकेकडून ‘माझी वसुंधरा ७.०’ अंतर्गत विशेष मोहीम; कचरा वर्गीकरणासाठी पथनाट्यांद्वारे प्रभावी प्रबोधन!‘कामगारांचा बळी घेणारी व्यवस्था खपवून घेणार नाही’; चिंचवडमधील ५ कामगारांच्या गुदमरून झालेल्या मृत्यूवर काशिनाथ नखाते आक्रमक!‘श्रमिकांच्या तळहातावर तरलाय शहराचा विकास’; हिंद रत्न कामगार पुरस्कार सोहळ्यात महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home अमरावती पर्यावरणपूरक उत्सवांसाठी महा अंनिसचा राज्यभरात जागर; डीजेचा दणदणाट रोखण्यासाठी नागरिकांना खंबीर राहण्याचे आवाहन!

पर्यावरणपूरक उत्सवांसाठी महा अंनिसचा राज्यभरात जागर; डीजेचा दणदणाट रोखण्यासाठी नागरिकांना खंबीर राहण्याचे आवाहन!

सण-उत्सव पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरे करण्याची भूमिका; अमरावती व पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचे जाहीर आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

डीजे-डॉल्बी व लेझर बीमचा वापर टाळून पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करा; महा अंनिसचे राज्यभर आवाहन!

अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन , दि. ०२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती : “देशातील सर्वच सण आणि उत्सव हे पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरे केले पाहिजेत. आगामी गणेशोत्सवात मानवी जीवनाला तसेच पशुपक्ष्यांना अत्यंत घातक ठरणाऱ्या डीजे-डॉल्बीचा दणदणाट आणि डोळ्यांना इजा पोहोचवणाऱ्या लेझर बीमचा वापर पूर्णपणे टाळावा,” असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (महा अंनिस) वतीने करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक उत्सवांसाठी महा अंनिसच्या वतीने सुरुवातीपासूनच व्यापक प्रबोधन आणि कृती कार्यक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये ‘विसर्जित मूर्ती दान करा – निर्माल्य गोळा करा’, ‘फटाकेमुक्त दिवाळी व नवीन वर्ष’, ‘होळीची पोळी गरजूला द्या – होळी लहान करा’, बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिर आणि ‘पर्यावरणस्नेही रंगपंचमी’ यांसारखे विविध उपक्रम समाजात राबवले गेले असून, त्यांना व्यापक समाजमान्यता व शासनमान्यता मिळाली आहे. सर्व जाती-धर्मांचे सण उत्सव हे पर्यावरणपूरकच व्हावेत, हीच अंनिसची भूमिका राहिली आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यात डॉल्बीचा आवाज पुन्हा मोठ्या प्रमाणावर घुमू लागला आहे. राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा त्रास वाढत असल्याबद्दल संघटनेने चिंता व्यक्त केली.
या वेळी महा अंनिसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, “धार्मिक सणातील श्रद्धेशी या डॉल्बीचा काहीही संबंध नाही. श्रद्धेचा संबंध हा भक्तीशी असतो आणि डॉल्बीचा संबंध हा केवळ उन्मादाशी आहे. सर्वांनाच त्रासदायक ठरणारी ही डीजे-डॉल्बी संस्कृती समाजातून पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी ‘डॉल्बीमुक्त महाराष्ट्र’ अभियानाच्या पाठीशी नागरिकांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.”

हे आवाहन महा अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर, जिल्हा प्रधान सचिव विजय डवरेसुभाष गौरखेडे, तसेच सचिन खोब्रागडे, मंजू वासनिक, वर्षा गावंडे, दिलीप लाडे, वैशाली राऊळ, भूमिका पहूरकर, नरेंद्र धर्माळे, आशिष देशमुख, राहुल खंडारे, संदीप हिवराळे, विजया करोले, प्रतिभा खापरे यांच्यासह ‘महा अंनिस’ अमरावतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!