news
Home पिंपरी चिंचवड एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला राष्ट्रीय स्तरावर तीन मानाचे पुरस्कार; पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक वैभवात मानाचा तुरा!

एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला राष्ट्रीय स्तरावर तीन मानाचे पुरस्कार; पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक वैभवात मानाचा तुरा!

नवी दिल्लीतील सोहळ्यात 'इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ स्कूल ॲक्रेडिटेशन'तर्फे गौरव; पीसीईटीच्या विश्वस्तांकडून विजेत्यांचे अभिनंदन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

विद्यार्थी भारताच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार: पद्माताई भोसले; एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला राष्ट्रीय स्तरावर तीन नामांकित पुरस्कार!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ०७ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी / रावेत: “आजचे विद्यार्थी हेच भारताच्या उज्ज्वल भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञान, मूल्ये, कौशल्ये आणि आत्मविश्वासाने समृद्ध करण्यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (PCET) एस. बी. पाटील पब्लिक स्कूल नेहमी विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून कार्य करत आहे. या गुणवत्तेची दखल घेत ‘आंतरराष्ट्रीय शाळा मान्यता परिषदे’च्या वतीने शाळेला राष्ट्रीय पातळीवर तीन पुरस्कार मिळणे ही संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानास्पद बाब आहे,” असे उद्गार पीसीईटीच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले यांनी काढले.
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ स्कूल ॲक्रेडिटेशन’च्या वतीने एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला राष्ट्रीय पातळीवरील ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार २०२६’ (Academic Excellence Award) प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यात शाळेसोबतच व्यवस्थापनातील नेतृत्वाचाही गौरव करण्यात आला. डॉ. बिंदू सैनी (प्राचार्या)‘उत्कृष्ट अध्यापन व प्रशासकीय कौशल्य पुरस्कार २०२६’ , शुभांगी कुलकर्णी (मुख्याध्यापिका) ‘उत्कृष्ट प्रशासकीय व प्रेरणादायी कौशल्य पुरस्कार २०२६’ . १०+२ शालेय शिक्षण पद्धतीत उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे, संस्थात्मक विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सातत्यपूर्ण सुधारणा या निकषांवर देशातील ३०० नामांकित शाळांमधून एस. बी. पाटील पब्लिक स्कूलची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली.

या राष्ट्रीय सोहळ्यात शाळेच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी यांना देशभरातून आलेल्या शिक्षणतज्ज्ञ व पुरस्कारार्थींसमोर ‘आजच्या काळातील मानसिक आरोग्याचे वाढते महत्त्व’ या विषयावर विशेष व्याख्यान देण्याचा बहुमान मिळाला. वाढत्या सोशल मीडियाचा तरुणांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम आणि पालकांच्या अपेक्षांमुळे येणारा ताण यावर त्यांनी अत्यंत प्रभावी विचार मांडले.

या दैदिप्यमान यशाबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्यांचे व शाळा परिवाराचे अभिनंदन केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!