news
Home पिंपरी चिंचवड ‘शिक्षकांना अवांतर कामांतून मुक्त करून अध्यापनावर भर हवा’; सांगवीतील शिक्षक दिन सोहळ्यात चंद्रप्रभा पवार यांचे प्रतिपादन!

‘शिक्षकांना अवांतर कामांतून मुक्त करून अध्यापनावर भर हवा’; सांगवीतील शिक्षक दिन सोहळ्यात चंद्रप्रभा पवार यांचे प्रतिपादन!

पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचा उपक्रम; वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ सभासदांचाही नागरी सत्कार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघात शिक्षक दिन उत्साहात साजरा; निवृत्त शिक्षिका चंद्रप्रभा पवार यांचा सत्कार!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी सुनील पोकरे, दि. ०७ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

सांगवी: पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघ, शितोळेनगर (सांगवी) यांच्या वतीने शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत करून प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमाला संघाचे माजी अध्यक्ष व पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सचिव ईश्वरलाल चौधरी, ज्येष्ठ सभासद चंद्रकांत चोपडे यांच्यासह ५० हून अधिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

संघाचे सचिव सुनील पोकरे यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून आपले विचार मांडले. “शिक्षक दिन हा शिक्षकांच्या ज्ञान, संस्कार, त्याग आणि योगदानाचा आदर व सन्मान करण्याचा पवित्र दिवस आहे. भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो,” असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात संघाच्या ज्येष्ठ सदस्या व सेवानिवृत्त शिक्षिका चंद्रप्रभा पवार यांचा शाल व श्रीफळ देऊन ज्येष्ठ सभासद चंद्रभागा कर्डीले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना चंद्रप्रभा पवार यांनी भावना व्यक्त केल्या: “पूर्वीच्या काळात शाळेत मुलांना मनापासून शिकवणे हेच शिक्षकांचे मुख्य कार्य असायचे. मात्र आज परिस्थिती बदलली असून शिक्षकांना शासकीय स्वरूपाची इतर अनेक अवांतर कामे दिली जातात. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे व प्रगतीकडे अपेक्षित लक्ष देणे शिक्षकांना कठीण जात आहे.”

या प्रसंगी संघातील ज्येष्ठ सभासदांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सेवानिवृत्त शिक्षिका चंद्रप्रभा पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ सभासद शैलाताई लक्का यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रकाश देशमुख, अशोक चव्हाणरमेश काटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश देशमुख यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रमेश काटे यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!