news
Home पिंपरी चिंचवड ‘मारुती कदमांचा सामाजिक वारसा संजय कदम समर्थपणे पुढे नेतील’; पिंपरी दौऱ्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे प्रतिपादन!

‘मारुती कदमांचा सामाजिक वारसा संजय कदम समर्थपणे पुढे नेतील’; पिंपरी दौऱ्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे प्रतिपादन!

कदम परिवाराकडून केंद्रीय मंत्र्यांचे जलोषात स्वागत; परिसरातील नागरिक अन् पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची संजय कदम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट; स्वर्गीय मारुती कदम यांच्या स्मृतीस केले अभिवादन!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे दि. ०७ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री खासदार रामदास आठवले यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर असताना देशाचे राष्ट्रीय मुख्य संयोजक संजय मारुती कदम यांच्या कदम परिवाराच्या कार्यालयाला आवर्जून सदिच्छा भेट दिली. या वेळी आठवले यांनी कदम परिवाराची आपुलकीने चौकशी करत देशाचे राष्ट्रीय नेते स्वर्गीय मारुती शंकर कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण वंदन केले.
“स्वर्गीय मारुती कदम साहेबांनी समाजकार्याचा जो वसा घेतला होता, त्यांचे ते अपूर्ण राहिलेले स्वप्न संजय मारुती कदम नक्कीच पूर्ण करतील,” असा विश्वास या प्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

भेट प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वर्गीय मारुती कदम यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. “धारावी नगरीत सुरुवातीच्या काळात आम्हा दोघांना एकत्र समाजकार्य करण्याची संधी मिळाली होती. भटक्या, विमुक्त जाती आणि जमातींच्या हक्कासाठी व उद्धारासाठी स्वर्गीय मारुती कदम यांनी केलेले कार्य अत्यंत अनन्यसाधारण व ऐतिहासिक असेच आहे. अशा कणखर आणि समर्पित नेत्याच्या सानिध्यात काम करायला मिळणे हे माझे भाग्यच होते,” अशा शब्दांत आठवले यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.

या प्रसंगी कदम परिवाराच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे अत्यंत उत्साहात व आदरातिथ्याने स्वागत करण्यात आले. युवानेते संतोष मारुती कदम यांनी केंद्रीय मंत्री आठवले यांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन विशेष स्वागत केले.
राष्ट्रीय नेते स्वर्गीय मारुती कदम यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा संजय मारुती कदम आणि युवानेते संतोष मारुती कदम अत्यंत समर्थपणे पुढे नेत असून, समाजात आणि जनमानसात त्यांचे नेतृत्व अधिक भक्कम होत असल्याचे या प्रसंगी उपस्थितांनी अधोरेखित केले.
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान परिसरातील नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, समस्त समाजबांधव आणि मोठा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!