news
पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर काशिनाथ नखाते यांचा प्रहार; उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निगडीत जल्लोष!‘महापौर निवासस्थान मध्यवर्ती भागात उभारा, प्राधिकरणातील जागा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीच ठेवा’; पिंपरीत शिवप्रेमी आक्रमक!‘माहितीअभावी एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहता कामा नये’; पिंपरी पालिकेच्या समाज विकास विभागाचा मोठा निर्णय!भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांना बसणार आळा; उच्चस्तरीय टास्क फोर्स राज्यातील सहा विभागांतून मागवणार सूचना!महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय व बंदरांच्या विकासासाठी नितेश राणे आक्रमक; शरद पवारांशी मुंबईत चर्चा!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड ते लोणावळा मेट्रो विस्तारासाठी मनसे आक्रमक; महामेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर यांना दिले पत्र!

पिंपरी-चिंचवड ते लोणावळा मेट्रो विस्तारासाठी मनसे आक्रमक; महामेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर यांना दिले पत्र!

मावळ पट्ट्यातील एमआयडीसी, शैक्षणिक संस्था अन् वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता मेट्रो गरजेची; सचिन चिखले यांचे प्रतिपादन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

निगडी ते लोणावळा मेट्रो मार्गाचा DPR तयार करा; मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे मागणी!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. ०७ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी / निगडी: पिंपरी ते निगडी (भक्ती-शक्ती) दरम्यान मेट्रोच्या कामाला वेग आला असतानाच, आता हा मेट्रो मार्ग पुढे मावळ तालुक्यातून थेट लोणावळ्यापर्यंत विस्तारित करण्याची जोरदार मागणी पुढे आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन तुकाराम चिखले यांनी पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठवून निगडी (भक्ती-शक्ती) ते लोणावळा या मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) त्वरित तयार करून आगामी बजेटमध्ये मंजूर करण्याची ठाम मागणी केली आहे.

सचिन चिखले यांनी निवेदनात नमूद केले आहे की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला लागूनच मावळ तालुका येतो. नुकतेच महामेट्रोचे बजेट सादरीकरण पार पडले असून, त्यात संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Public Transport) आणि मेट्रो विस्तारावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मावळ भागातील लाखो नागरिक, कामगार, विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरदार वर्ग दैनंदिन कामासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात ये-जा करत असतात. त्यामुळे हा मेट्रो विस्तार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
मावळ पट्ट्यात मोठ्या प्रमाणात नामांकित कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज आणि एमआयडीसी कंपन्या कार्यरत आहेत.  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळ भागात नवीन भव्य एमआयडीसी उभारण्याची घोषणा केली असून, त्या अनुषंगाने प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. देहूरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत आणि लोणावळा हा संपूर्ण पट्टा आता मोठ्या प्रमाणावर नागरी वस्तीचा झाला असून, औद्योगिक व व्यावसायिक दृष्टिकोनातून नागरिकांची शहरात मोठी लगबग असते.

भविष्यातील वाहतूक कोंडीवर उपाय आणि लोकहिताचा दृष्टिकोन लक्षात घेता, निगडी ते लोणावळा या मेट्रो मार्गाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे महामेट्रोने आगामी बजेटमध्ये या मार्गाचा प्राधान्याने समावेश करावा आणि लवकरात लवकर DPR (Detailed Project Report) तयार करून त्यास मंजुरी द्यावी, अशी आग्रही विनंती मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महामेट्रो प्रशासनाकडे केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!