news
Home पिंपरी चिंचवड ‘राजे उमाजी नाईक यांचा लढा अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारा’; पिंपरी पालिकेत जयंती सोहळा संपन्न!

‘राजे उमाजी नाईक यांचा लढा अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारा’; पिंपरी पालिकेत जयंती सोहळा संपन्न!

आद्यक्रांतीवीराचा विचार व वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प; पालिका प्रशासनाकडून भावपूर्ण वंदन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

थोर क्रांतीकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भावपूर्ण अभिवादन!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. ०७ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस आणि ऐतिहासिक योगदानास अत्यंत आदराने व उत्साहात अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण वंदन करण्यात आले.
या वेळी महापालिकेचे उपआयुक्त आण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते प्रशांत माकर, केतन चव्हाण, स्वप्नील जाधव, प्रतिक माकर, आशा तटले, कल्पना माकर तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजे उमाजी नाईक हे ब्रिटिशांच्या अन्यायी, अत्याचारी आणि जुलमी सत्तेविरुद्ध पेटून उठणारे महाराष्ट्रातील आद्य शूर क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाच्या उच्च मूल्यांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवून वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा हा महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील अत्यंत प्रेरणादायी आणि सुवर्ण अध्याय मानला जातो. त्यांच्या अतुलनीय धैर्य, शौर्य आणि त्यागाची प्रेरणा आजही प्रत्येक नागरिकाच्या मनात कायम आहे.

क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अलौकिक कार्याचे स्मरण करत, त्यांच्या संघर्षाचा व विचारांचा महान वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. देशभक्तीसोबतच सामाजिक समता, न्याय, स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध कणखरपणे लढण्याची प्रेरणा राजे उमाजी नाईक यांच्या जीवनकार्यातून अखंडपणे मिळते, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!