news
Home पिंपरी चिंचवड राजवाडेनगरमध्ये पिंपरी महापालिकेची मोठी कारवाई; अनधिकृत बांधकामांवर फिरवला बुलडोझर!

राजवाडेनगरमध्ये पिंपरी महापालिकेची मोठी कारवाई; अनधिकृत बांधकामांवर फिरवला बुलडोझर!

'ग' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत महापालिकेचे धडक सत्र; ७५ एम.एस.एफ. जवानांसह मोठा पोलीस ताफा तैनात | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेची काळेवाडीत धडक कारवाई; राजवाडेनगरमधील ७ हजार ४०० चौ. फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०७ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी / काळेवाडी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या काळेवाडी येथील राजवाडेनगर परिसरात पालिकेच्या वतीने आज, सोमवारी (दि. ०७ सप्टेंबर) अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली. अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तात राबवण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल ७ हजार ४०० चौरस फूट क्षेत्रफळाचे अनधिकृत बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले.
महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उप-आयुक्त आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या प्रसंगी पालिकेचे शहर अभियंता, सहशहर अभियंता (बांधकाम परवानगी व विद्युत), उप-आयुक्त, सहाय्यक आयुक्त, ‘ब’, ‘क’, ‘ड’ व ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता (बांधकाम परवानगी) आणि इतर कार्यकारी अभियंता (विद्युत व स्थापत्य) घटनास्थळी उपस्थित होते.

अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या या मोहिमेत महापालिकेचा मोठा प्रशासकीय आणि तांत्रिक ताफा सहभागी झाला होता. अभियांत्रिकी पथक  महापालिकेचे १० कार्यकारी अभियंता, २८ उप-अभियांत्रिकी अधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि १६ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक) या मोहिमेत प्रत्यक्ष कार्यरत होते.  १ पोकलेन, ५ जेसीबी आणि २५ मजुरांच्या साहाय्याने हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच ७५ एम.एस.एफ. (MSF) जवानांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी २ अग्निशमन वाहने आणि १ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती.

 

महापालिका प्रशासनाने शहरात अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उचलला असून, नागरिकांनी परवानग्यांशिवाय अनधिकृत बांधकामे करू नयेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन Daily News. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!