news
Home पिंपरी चिंचवड पुण्यात उद्योजकांसाठी तंत्रज्ञानाची पर्वणी; ‘पीएमटीएक्स’ आणि ‘फॅक्टेक २०२६’ प्रदर्शनाचे मोशीत उद्घाटन!

पुण्यात उद्योजकांसाठी तंत्रज्ञानाची पर्वणी; ‘पीएमटीएक्स’ आणि ‘फॅक्टेक २०२६’ प्रदर्शनाचे मोशीत उद्घाटन!

एमआयडीसीचे सीईओ दीपेंद्र सिंह कुशवाह अन् उद्योग विकास आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते सोहळा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पुणे मशीन टूल एक्स्पो आणि ‘फॅक्टेक २०२६’चे मोशीत भव्य उद्घाटन; आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान अन् उद्योगातील नव्या संधींचे प्रदर्शन!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०७ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी / मोशी: इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IMTMA) यांच्या वतीने आयोजित ‘पुणे मशीन टूल एक्स्पो (PMTX) २०२६’ आणि त्यासोबत आयोजित ‘फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पो (FACTEQ) २०२६’ चे आज मोशी (पुणे) येथील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC) येथे दिमाखदार उद्घाटन पार पडले.
या प्रदर्शनाचे अधिकृत उद्घाटन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह (IAS), महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विकास आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे (IAS), टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेडचे उपाध्यक्ष अरविंद गोयल, आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेडचे कार्यकारी संचालक नलिनीकांत गोल्लागुंटा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी आयएमटीएमएच्या अध्यक्षा मोहिनी केळकर, उपाध्यक्ष विक्रम साळुंके, आणि आयएमटीएमएचे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (DG & CEO) जिबाक दासगुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत बोलताना आयएमटीएमएच्या अध्यक्षा मोहिनी केळकर म्हणाल्या, “महाराष्ट्रात भारतातील सर्वात मजबूत मशीन टूल उद्योग व्यवस्था कार्यरत आहे. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नाशिक आणि कोल्हापूर येथे महत्त्वाचे औद्योगिक समूह आहेत. पुणे हे विशेषतः ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग कंपन्यांचे प्रमुख केंद्र असल्याने येथे उच्च अचूकतेच्या (High Precision) उत्पादन तंत्रज्ञानाची मोठी गरज भासते. ही गरज मशीन टूल उद्योग सक्षमपणे पूर्ण करतो. महाराष्ट्रात आयएमटीएमएचे सुमारे १८० सदस्य असून, संस्था गेल्या दोन दशकांपासून उद्योगांना सातत्याने सहकार्य करत आहे.”

आयएमटीएमएचे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिबाक दासगुप्ता म्हणाले, “पुणे हे विविध उत्पादन उद्योगांचे अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. या भागातील उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी आयएमटीएमएकडून पीएमटीएक्स आणि फॅक्टेक (FACTEQ) प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक आवृत्तीसोबत या प्रदर्शनांचा विस्तार होत असून मशीन टूल्सचे उत्पादक आणि वापरकर्त्यांकडून या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.”

 तब्बल ११ हजार चौरस मीटर क्षेत्रफळात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. १७५ हून अधिक आघाडीच्या कंपन्या, ३०० व्यावसायिक प्रतिनिधी आणि १८ हजारांहून अधिक अभ्यागत यात सहभागी होणार आहेत.  या प्रदर्शनाबाबत अधिक माहितीसाठी www.mtx.co.in आणि www.facteq.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

 

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!