50
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सुरेख नियोजनातून गणेश विसर्जन घाटांची पाहणी; सुरक्षा व सुविधांचा घेतला आढावा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची धुरा हाती घेतल्यापासून शहराच्या सर्वांगीण विकासाचे आणि प्रशासकीय घडीचे अत्यंत नेटके व सूक्ष्म नियोजन करणारे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा गणेशोत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडत आहे. आगामी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात भाविकांची कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि महापौर रवी लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख विसर्जन घाटांची संयुक्त पाहणी करून सुरक्षा व नागरी सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.

पिंपरी-चिंचवड शहराचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालवणारे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विसर्जन व्यवस्थेच्या अनुषंगाने सर्वच विभागांना परस्पर समन्वयाने काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
“विसर्जन घाटांवरील कृत्रिम जलकुंडांची स्वच्छता, डागडुजी, विद्युत व्यवस्था आणि जीवनरक्षकांची नियुक्ती पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवली आहे. प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याने स्वतः मैदानावर उतरून सुविधांची खात्री करावी. भाविकांची सुरक्षितता आणि सोय याला प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे.”— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.
आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी ठिकठिकाणी स्वतंत्र निर्माल्य कलश, मूर्ती संकलन केंद्रे आणि कृत्रिम विसर्जन हौदांची अत्यंत सुंदर व्यवस्था उभारण्यात आली आहे. महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, विसर्जन घाटांवर चिखल किंवा पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ मार्ग ठेवावेत. तसेच, सुरक्षा व्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड न करता सीसीटीव्ही यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि अग्निशमन दल सज्ज ठेवण्यात आले आहे.

महापौर व आयुक्तांच्या शिष्टमंडळाने शहरातील महत्त्वाच्या घाटांची पाहणी केली. सुभाष घाट (पिंपरी) ‘ड’ प्रभाग अध्यक्षा सविता खुळे, नगरसदस्या प्रियंका कुदळे, निकिता कदम उपस्थित, अहिल्यादेवी होळकर घाट व वेताळ महाराज घाट (सांगवी) ‘ह’ प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे उपस्थित, वाकड गावठाण घाट ‘ज’ प्रभाग अध्यक्षा आरती चोंधे, नगरसदस्या रेश्मा भुजबळ, नगरसदस्य राहुल कलाटे, माजी नगरसदस्य राम वाकडकर उपस्थित, थेरगाव पूल घाट (चिंचवड) विधानपरिषद सदस्या आमदार उमा खापरे, ‘ब’ प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे, नगरसदस्य शेखर चिंचवडे, सुरेश भोईर उपस्थित, जाधववाडी घाट (रावेत) नगरसदस्या ऐश्वर्या तरस, नगरसदस्य राजेंद्र तरस उपस्थित. तसेच रावेत, मोशी खाण आणि इंद्रायणी नदी घाटाचीही पाहणी करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, डॉ. प्रदीप ठेंगल, व्यंकटेश दुर्वास, सहायक आयुक्त तानाजी नरळे, सह शहर अभियंता अनिल भालसाखळे, महेश कावळे, क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, परशुराम वाघमोडे, गोरक्षनाथ लिम्हण, अजिंक्य येळे, कार्यकारी अभियंता सोहम निकम, जहिरा मोमीन, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे आदी अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दूरदृष्टी आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासन विसर्जन सोहळ्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले असून नागरिकांमधून या सुटसुटीत नियोजनाचे विशेष कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
