news
दिल्ली मतदार यादी पुनरीक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; बाधित मतदारांची नावे आणि कारणे सार्वजनिक करण्याचे आवाहन!‘नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समिती बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!‘शिक्षकांमुळेच महापालिका शाळांकडे पालकांचा कल वाढला’; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान!‘शहराच्या नियोजनबद्ध विकासात पालिकेच्या अभियंत्यांचे योगदान अद्वितीय’; महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!‘अभिजात मराठी भाषा सप्ताह ही लोकचळवळ व्हावी’; पिंपरी महापालिकेच्या नियोजन बैठकीत महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड ‘शिक्षकांमुळेच महापालिका शाळांकडे पालकांचा कल वाढला’; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान!

‘शिक्षकांमुळेच महापालिका शाळांकडे पालकांचा कल वाढला’; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान!

विविध क्षेत्रांतील ३८ कर्मचाऱ्यांचा गौरव; विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम अन् विवेक वेलणकर यांच्या व्याख्यानाने रंगला सोहळा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

विद्यार्थ्यांना संस्कारक्षम आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करतात: आमदार शंकर जगताप

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १६ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाहीत, तर त्यांना संस्कारक्षम आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे काम करतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये राबवले जाणारे शैक्षणिक उपक्रम हे कोणत्याही खासगी शाळेतील उपक्रमांपेक्षा कमी नाहीत. आज महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांच्या रांगा लागत आहेत. महापालिकेतील शिक्षकांनी आपल्या कार्यातून महापालिका शाळांकडे पाहण्याचा सर्वांचाच दृष्टिकोन अधिक सकारात्मक करण्यासाठी निरंतर प्रयत्न करावेत,” असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, महिला व बालकल्याण समिती सभापती राणीमाई पठारे, अतिरिक्त आयुक्त विक्रान्त बगाडे, उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्यासह शिक्षण समिती सदस्य आणि नगरसदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. महापालिकेचा सर्वांत महत्त्वाचा विभाग म्हणजे शिक्षण विभाग आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला सुजाण नागरिक घडविताना त्यांची भावनिक बुद्धिमत्ता वाढविणे व त्यांच्यातील उपजत गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. शिक्षक हा केवळ विषयाचे ज्ञान देणारा घटक नसून विद्यार्थ्यांच्या भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासात महत्त्वाचा वाटा उचलतो.” या वेळी शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपायुक्त ममता शिंदे यांनी केले.

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण ३८ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा आमदार शंकर जगतापआयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. आदर्श बालवाडी शिक्षिका वंदना पराते, संगीता इंगळे, राजश्री वाळुंज, आदर्श शिक्षक (प्राथमिक विभाग) सुरेखा कुंजीर, वीणा दाभाडे, मनीषा पिंगळे, राजश्री रासकर, योगेश्वरी लोणकर, ज्योती गिरी, सविता कांबळे, सुनीता बामणे, सुनीता दहिफळे, वंदना जगनाडे, बाळासाहेब जाधव, प्रतिभा नेवकर, विशेष पुरस्कार पूजा कदम, सुनिला दिवाणे, आदर्श शिक्षक (माध्यमिक विभाग) कविता पाचरणे, नसिफा शेख, अपर्णा चिंचोलकर, रुपाली गाथा, दामहे नूतनलाल, विद्या मिसाळ, आदर्श शिक्षक (खासगी विभाग) मनीषा कलशेट्टी, विजयश्री काजळे, आदर्श शिक्षक (मनपा व संस्था संचलित) सुप्रिया पाटील, गोकुळ पवार, प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान, पर्यवेक्षक जयमाला गावडे, सरस्वती भेगडे, प्रमिला जाधव, ज्योती तापकीर, सुजाता कर्जतकर, प्रमिला होले, श्रीकांत चौगुले, अंजली झगडे, खालेदा खान, सुनीता गिते.

पुरस्कार सोहळ्यात पिंपळे गुरव शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘मंगळागौर नृत्य’ सादर केले. रावेत शाळेतील शिक्षकांनी ‘बाई पण भारी देवा’ गाण्यावर नृत्य सादर करत नोकरदार महिलांचा संघर्ष रेखाटला, तर थेरगाव शाळेतील शिक्षिका स्नेहल भोसले यांनी भरतनाट्यमद्वारे ‘गणेश वंदना’ सादर केली.
कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते व करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांचे विशेष व्याख्यान पार पडले. त्यांनी बदलत्या शैक्षणिक वातावरणात करिअरच्या विविध संधी, योग्य मार्ग निवड आणि भविष्यातील आव्हाने यावर शिक्षकांना मार्गदर्शन केले.

“शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. महापालिका शाळांमधील शिक्षकांनी आपल्या गुणवत्तापूर्ण कार्यातून महापालिका शाळांची गुणवत्ता आणि विश्वासार्हता अधिक उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.”
— रवी लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
“महापालिका शाळांमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी व कौशल्यांचा विचार करून त्यांना योग्य दिशा देण्याचे काम शिक्षक करत आहेत.”
— डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!