27

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पुणे, कोल्हापूर आणि अमरावती विभागाचा दबदबा; विविध वयोगटांतील विजेत्यांची घोषणा!
अमरावती विशेष वृत्त संकलन क्रीडा प्रतिनिधी, दि. १७ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२६-२७ मध्ये राज्यभरातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. १७ आणि १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या विविध वजनी गटांत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यांमध्ये पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि अमरावती विभागाच्या मल्लांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले.
१) १७ वर्षांखालील मुले (Boys U-17)
८८ किलो आतील गट- प्रथम सुजल धडांबे (पुणे विभाग), द्वितीय सौरभ महाजन (नाशिक विभाग), तृतीय अनुज मंगरुळे (छत्रपती संभाजीनगर विभाग).
९८ किलो आतील गट- प्रथम तुळशीदास मेगणे (कोल्हापूर विभाग), द्वितीय साई मिडगुळे (पुणे विभाग), तृतीय सर्वेश इंगळे (अमरावती विभाग).
९८ किलो वरील गट- प्रथम आर्यन वरकड (पुणे विभाग), द्वितीय रोहित कांबळे (लातूर विभाग), तृतीय कृष्णा माने (नाशिक विभाग).
२) १७ वर्षांखालील मुली (Girls U-17)
६९ किलो आतील गट- प्रथम साधवी चौधरी (नाशिक विभाग), द्वितीय धनश्री थोरात (कोल्हापूर विभाग), तृतीय सानवी बोरकर (पुणे विभाग).
७७ किलो आतील गट- प्रथम अंबिका बोरुडे (पुणे विभाग), द्वितीय आयशा पटेल (कोल्हापूर विभाग), तृतीय सौम्या चव्हाण (मुंबई विभाग).
७७ किलो वरील गट- प्रथम खुशी सकपाळ (मुंबई विभाग), द्वितीय सानवी जगडे (पुणे विभाग), तृतीय प्रणिती चव्हाण (कोल्हापूर विभाग).
३) १९ वर्षांखालील मुले (Boys U-19)
७१ किलो आतील गट- प्रथम प्रितम वोड (पुणे विभाग), द्वितीय अभिजित राऊत (छत्रपती संभाजीनगर विभाग), तृतीय वैभव पाटील (कोल्हापूर विभाग).
८८ किलो आतील गट- प्रथम श्रेयस सूर्यवंशी (कोल्हापूर विभाग), द्वितीय रोहित पवार (लातूर विभाग), तृतीय क्रिश पाटील (मुंबई विभाग).
९८ किलो गट- प्रथम सम्यक कांबळे (कोल्हापूर विभाग), द्वितीय राजस शिंदे (मुंबई विभाग), तृतीय त्र्यंबक महाडीक (नागपूर विभाग).
११० किलो आतील गट- प्रथम पियुष आढावे (अमरावती विभाग), द्वितीय ऋतुराज आंब्रे (पुणे विभाग), तृतीय वेद चौगुले (कोल्हापूर विभाग).
११० किलो वरील गट- प्रथम श्लोक सुरळकर (अमरावती विभाग), द्वितीय धीरेन्द्र सिंग (पुणे विभाग), तृतीय इस्माईल वसीम तालीब (मुंबई विभाग).
४) १९ वर्षांखालील मुली (Girls U-19)
६९ किलो आतील गट- प्रथम इशान्या राऊत (पुणे विभाग), द्वितीय पुजा थेपेकर (अमरावती विभाग), तृतीय रेणु मुडलगी (कोल्हापूर विभाग).
७७ किलो आतील गट- प्रथम रतीका चिंचवाडे (पुणे विभाग), द्वितीय दिव्या कल्याणकर (अमरावती विभाग), तृतीय सई करणाळे (कोल्हापूर विभाग).
८६ किलो गट- प्रथम आनंदी सांगळे (नाशिक विभाग), द्वितीय श्रेया गायकवाड (छत्रपती संभाजीनगर विभाग), तृतीय आराधित खोत (कोल्हापूर विभाग).
८६ किलो वरील गट- प्रथम निकीता शिंदे (कोल्हापूर विभाग), द्वितीय श्रेया कानडे (पुणे विभाग), तृतीय पुर्वा अन्नदाते (मुंबई विभाग).
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

