news
Home पिंपरी चिंचवड ‘सच्चा कलाकार कलेच्या माध्यमातून रसिकांच्या हृदयात सदैव अमर राहतो’; चिंचवडमध्ये पार पडली श्रद्धांजली सभा!

‘सच्चा कलाकार कलेच्या माध्यमातून रसिकांच्या हृदयात सदैव अमर राहतो’; चिंचवडमध्ये पार पडली श्रद्धांजली सभा!

चिंचवडमधील तारांगण सभागृहात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व अभिनेत्री मधू कांबीकर यांना आदरांजली; मान्यवरांची उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चिंचवडमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या स्मृतींना उजाळा!

चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १७ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहर कलाप्रेमी मंचाच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्क परिसरातील तारांगण सभागृहात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर, कलाकार, साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून दोन्ही महान कलाकारांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री गिरीश प्रभुणे होते.

अध्यक्षीय भाषणात पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी मधू कांबीकर यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे स्मरण करताना भावुक आठवण सांगितली. ते म्हणाले, “कोल्हाटी समाजातील मुलींनी नाचगाणी सोडून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी मी उभारत असलेल्या वसतिगृहाला मधू कांबीकर यांनी २५ हजार रुपयांची मोलाची मदत केली होती. त्यांच्या या मदतीमुळेच सामाजिक समरसतेचा आणि परिवर्तनाचा हा प्रवास पुढे निर्धोकपणे पार पडू शकला.”
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “सच्चा कलाकार हा आपल्या कलेच्या माध्यमातून रसिकांच्या हृदयात सदैव अमर राहतो. त्याच्या कलेचा वारसा कधीच संपत नाही.”

ज्येष्ठ कलावंत वसंत अवसरीकर यांनी मधू कांबीकर यांच्यासोबत नाटक आणि चित्रपटांमध्ये काम करतानाचे समृद्ध अनुभव सांगत, मधुताई आणि ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.- वसंत अवसरीकर

 

त्यांनी नाना पाटेकर यांच्या अत्यंत साध्या, निष्कपटी आणि वास्तववादी स्वभावाचे अनुभव मांडले. – पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर

 

यांनी मधू कांबीकर यांच्यासोबतच्या शालेय जीवनातील आठवणी सांगत त्यांच्यातील संवेदनशील सामाजिक भान विशद केले. – पत्रकार दादाराव आढाव

 

यांनी दोन्ही कलाकारांच्या संघर्षमय व समृद्ध जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात माणुसकी जपण्याचे आवाहन उपस्थितांना केले. – पत्रकार अश्विनी सातव 
मान्यवरांनी मांडलेल्या आठवणींमुळे संपूर्ण सभागृहातील वातावरण अत्यंत भावुक झाले होते.

या श्रद्धांजली सभेला काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, निहाल पानसरे, आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्यासह शहरातील अनेक प्रमुख नागरिक व कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार व लेखक विजय जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन पत्रकार गोविंद वाकडे यांनी केले. अविनाश कांबीकर यांनी उपस्थितांचे आभार मानून श्रद्धांजली सभेचा समारोप केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल माने, प्रवीण तुपे, अनिस पठाण, विष्णु मांजरे, गणेश दिघे आणि नितीन भोगले यांनी विशेष परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!