news
Home पुणे ‘वेद समजले नाहीत तरी चालतील, समाजाची वेदना समजा’; भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे डॉ. अभिजीत सोनवणे सम्मानित!

‘वेद समजले नाहीत तरी चालतील, समाजाची वेदना समजा’; भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे डॉ. अभिजीत सोनवणे सम्मानित!

पुण्यातील हिंदू शौर्य दिन व विराट मेळाव्यात विविध क्षेत्रातील दिग्गजांना पुरस्कार प्रदान; डॉ. संजय उपाध्ये यांचे मार्गदर्शन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

प्रत्येकाने ‘श्रीकृष्ण’ होण्याची वेळ आली: डॉ. संजय उपाध्ये; हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानतर्फे विराट हिंदू मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव!

पुणे/ पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २५ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: अधर्माची वाढ झाल्यानंतर मी पुन्हा जन्म घेतो, असे श्रीकृष्णाने सांगितले असले तरी, आता हिंदूंनी केवळ सदगुणांचा अतिरेक करत गप्प बसू नये, तर आपले संख्याबळ दाखवणे ही आजची काळाची गरज आहे. बुद्धिवादाच्या नावाखाली साहित्यिक बुद्धिभेद करत आहेत. जेव्हा अस्तित्वाचा मुद्दा समोर येतो, तेव्हा विवेक बाजूला ठेवावा लागतो. आता पुन्हा कोणताही ‘श्रीकृष्ण’ मदतीला येणार नाही, तर प्रत्येक नागरिकानेच स्वतः ‘श्रीकृष्ण’ होऊन उभे राहण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी केले.
हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सव व विजयादशमीच्या निमित्ताने आयोजित ‘हिंदू शौर्य दिन – विराट हिंदू मेळाव्यामध्ये’ ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. या मेळाव्यात विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

या विराट मेळाव्यात ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांच्या हस्ते उल्लेखनीय सामाजिक व सार्वजनिक कार्य करणाऱ्या खालील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. डॉ. अभिजीत सोनवणे यांना ‘स्व. प्रा. एकनाथजी नाणेकर स्मृती समाजभूषण पुरस्कार २०२६’ , ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांना ‘स्व. संजय आर्य स्मृती पत्रकार भूषण पुरस्कार २०२६’ , निलंगा येथील श्री राधाकृष्ण फाउंडेशनचे संस्थापक आकास सोळंके यांना ‘कार्य गौरव पुरस्कार २०२६’ . मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी उपमहापौर शर्मीला बाबर, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. उत्तम दंडीमे, उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव सुहास पोफळे, समन्वयक कैलास बारणे, मिलिंद एकबोटे, मंदार देशपांडे, चंद्रकांत नखाते, योगिता बारणे, सुरेश भोईर, सुरेंद्र करमचंदानी, सविता एकनाथ नाणेकर, सुजाता पोफळे, महेश कुलकर्णी, अर्थ सल्लागार अनुजा घाडगे, अतुुल जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या मार्गदशनात डॉ. संजय उपाध्ये पुढे म्हणाले की, “या राष्ट्रासाठी ज्या अल्पसंख्याकांनी आपले कर्तृत्व दाखवले, त्यांना देशवासीयांनी डोक्यावर घेतले. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत ५ शिक्षणमंत्री अल्पसंख्याक होते. इतर देशांच्या तुलनेत भारतातील अल्पसंख्याक अधिक सुरक्षित आणि विकासाचे लाभार्थी आहेत. भारताच्या शेजारील देशांमध्ये हिंदूंची संख्या सातत्याने घटत असताना, भारतात मुस्लिमांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब आहे. आता राजकारण बाजूला सारून सर्वांनी देशहित डोळ्यांसमोर ठेवून एकत्र आले पाहिजे, अन्यथा युरोपियन राष्ट्रांप्रमाणे भारताची स्थिती होईल.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. उत्तम दंडीमे यांनी हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या स्थापनेमागची भूमिका स्पष्ट केली. वैज्ञानिक दृष्टिकोनातून हिंदू धर्म समजून घेणे, धर्म व विज्ञानाची सांगड घालून अंधश्रद्धेच्या पलीकडे जाणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घरोघरी पोहोचवणे हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. अभिजीत सोनवणे म्हणाले की, “मी दुर्लक्षित व भिक्षेकरी वर्गाची वैद्यकीय सेवा करतो. दुचाकीवर चालणारा फिरता दवाखाना घेऊन शहरभर फिरतो आणि त्यांना उपचारासोबतच स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे कौशल्य शिकवतो. मंदिराच्या आत भक्त देवाकडे मागत असतात, तर भिक्षेकरी मंदिराबाहेर भक्तांकडे मागत असतात. या भिक्षेकरी मुलांना दत्तक घेऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम आम्ही करत असून नागरिकांनी मला ‘भिकाऱ्यांचा डॉक्टर’ अशी पदवी दिली आहे, ज्याचा मला सार्थ अभिमान आहे. वेद समजले नाहीत तरी चालतील, परंतु समाजाची वेदना प्रत्येक नागरिकाने समजून घेतली पाहिजे.”
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी कुमार जाधव, दत्तात्रय सूर्यवंशी, अतुल आचार्य, नामदेव शिंत्रे, विजय गुंजाळ, दिगंबर रिद्धीवाडे, हेमदेव थापर, मनोज बोरसे, शिवाजी रेड्डी, दिलीप कुलकर्णी, रमेश अर्धाले, गोविंद बोळे, अलका आर्य, तेजस्विनी जटाळ, पद्मेश कुलकर्णी, बापू मिरजकर, संजय भाट आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र घावटे यांनी केले, तर आभार सुहास पोफळे यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!