news
Home पिंपरी चिंचवड ‘परतीचा पाऊस न झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका सतर्क; भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी पाणी बचतीचे नियोजन!’

‘परतीचा पाऊस न झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका सतर्क; भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी पाणी बचतीचे नियोजन!’

पालिका इमारती व क्षेत्रीय कार्यालयांतील गळती तातडीने रोखण्याचे आदेश; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा विभागप्रमुखांना इशारा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पाणी बचतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे कडक निर्देश!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २४ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात पाणी बचत करण्यासोबतच पाण्याचा होणारा अपव्यय पूर्णपणे रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व संबंधित विभागांनी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे कडक निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. यासंदर्भातील विशेष परिपत्रक आयुक्तांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे.
पाणी बचतीबाबत देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी संबंधित विभागप्रमुखांनी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत करून घ्यावी. यामध्ये कोणताही दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही परिपत्रकात देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून ६.५५ टीएमसी, भामा आसखेड धरणातून २.१५ टीएमसी आणि आंद्रा धरणातून १.२९ टीएमसी असे एकूण ९.९९ टीएमसी पाणी आरक्षण मंजूर आहे. शहराची सद्यःस्थितीतील अंदाजित लोकसंख्या ३८ लाख असून, दररोज सुमारे ६५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला जातो. सध्याच्या वितरण व्यवस्थेनुसार शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
पवना धरणामध्ये १४ ऑक्टोबर २०२६ अखेर ९७.१७ टक्के, तर आंद्रा धरणामध्ये ९५.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, सप्टेंबर २०२६ मध्ये परतीचा पाऊस न झाल्यामुळे उपलब्ध पाणीसाठा आणि मागील वर्षांचा अनुभव लक्षात घेता, भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच पाणी बचतीचे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

 महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, सर्व क्षेत्रीय कार्यालये, रुग्णालये, शाळा, भाजी मंडई व इतर इमारतींमधील नळ व पाणीपुरवठा उपकरणांची तपासणी करावी. कुठेही पाणीगळती आढळल्यास तातडीने दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय टाळावा. पालिकेच्या सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचतीविषयी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी. सार्वजनिक स्वच्छतागृहांसह आरोग्य विभागाच्या सर्व ठिकाणी गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर होणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्यावी.  क्रीडांगणांवर पाणी मारण्यासाठी आणि उद्यानांमधील झाडांना पाणी देण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर पूर्णपणे टाळावा. त्याऐवजी एसटीपी (STP) प्रकल्पांमधून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा (Treated Sewage Water) वापर करण्याचे नियोजन करावे.

 

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!