news
Home पिंपरी चिंचवड ‘आद्यकवी महर्षि वाल्मिकींना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून विनम्र अभिवादन’; महापालिका भवन व वायसीएममध्ये उत्साह!

‘आद्यकवी महर्षि वाल्मिकींना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून विनम्र अभिवादन’; महापालिका भवन व वायसीएममध्ये उत्साह!

उपमहापौर शर्मिला बाबर व अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन; मनपा पदाधिकारी व समाजधुरीण उपस्थित | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महर्षि वाल्मिकी जयंती साजरी; महापालिका मुख्य इमारत व YCM रुग्णालयात प्रतिमेस अभिवादन!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आद्यकवी, थोर महर्षि वाल्मिकी यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या प्रसंगी महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत आणि यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालय येथे विशेष अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आयोजित कार्यक्रमात उपमहापौर शर्मिला बाबर आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या हस्ते महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, सह आयुक्त मनोज लोणकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे माजी उपाध्यक्ष ॲड. सागर चरण, सामाजिक कार्यकर्ते राजेश बडगुजर, सोमनाथ बेद, विष्णू चावरिया, राहुल चावरिया, नरेश गुहर, अशोक वाल्मिकी, अनिल लखण, प्रकाश सौदा, ओमप्रकाश सौदा, मुकेश बंदमड, सुशील खैरालिका, सुनील चटोले यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयातही महर्षि वाल्मिकी जयंतीनिमित्त उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेविका वर्षा जगताप, वाय. सी. एम. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, उपअधीक्षक डॉ. मनीषा सूर्यवंशी, भूलतज्ज्ञ डॉ. मारूती गायकवाड, नोडल अधिकारी डॉ. छाया शिंदे, मेट्रन वत्सला वाजे, स्वाती कुलकर्णी, आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, आरोग्य सहाय्यक मोहन वाघमारे, तसेच अभिषेक फुगे, नंदू कानडे, प्रेमकुमार रेनवा, निलेश बहुले आदी उपस्थित होते.
महर्षि वाल्मिकी यांनी दिलेला मानवी मूल्यांचा आणि नैतिकतेचा संदेश आजच्या युगातही अत्यंत मार्गदर्शक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!