news
Home पिंपरी चिंचवड ‘सामाजिक सलोखा अन् आदरांजली’; पिंपरीत विविध संघटनांच्या वतीने महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी!

‘सामाजिक सलोखा अन् आदरांजली’; पिंपरीत विविध संघटनांच्या वतीने महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी!

पिंपरीत आरोग्य कार्यालयात भावपूर्ण वातावरणात प्रतिमा पूजन; सचिन अण्णा लिमकर व युवराज दाखले यांची प्रमुख उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

छावा मराठा सेना व शिवशाही शासन पक्षाच्या वतीने महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्साहात साजरी!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: छावा मराठा सेना आणि शिवशाही शासन पक्षाच्या संयुक्त विद्यमाने आद्यकवी, थोर महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती पिंपरीत मोठ्या उत्साहात व आदरांजलीपूर्वक साजरी करण्यात आली. पिंपरी येथील ज्योतीबा उद्यान शेजारील महापालिकेच्या आरोग्य कार्यालयात या विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
छावा मराठा सेनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन अण्णा लिमकर आणि सचिव सचिन भिसे यांच्या शुभहस्ते महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

या अभिवादन सोहळ्यास शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मातंग संघाचे संस्थापक प्रमुख तथा लोकसेवक युवराज भगवान दाखले, छावा मराठा सेनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन अण्णा लिमकर, सचिव सचिन भिसे, पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष शुभम बिरादार, शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मातंग संघाच्या महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा उषामाई कांबळे, सचिन एडके, छावा मराठा सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल धस, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा धनगर समाजाचे नेते रामभाऊ सूर्यवंशी आणि ज्येष्ठ नेते नामदेवराव रिट्टे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी महर्षी वाल्मिकी ऋषी यांनी दिलेला सत्य, नीती आणि सामाजिक समानतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!