news
‘चौकशी समिती कागदावरच, शिक्षण विभाग शाळा व्यवस्थापनाचे हितसंबंध जोपासतंय का?’; ॲड. उमेश खंदारे यांचा थेट सवाल!‘शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखेंच्या वारशाचा विजय’; पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांची बाजी!‘प्रवाशांची सुरक्षा अन् रिक्षाचालकांचा रोजगार’; पिंपरी-चिंचवडमध्ये विनापरवाना चालणाऱ्या बाईक टॅक्सींवर आरटीओचा दणका!‘महाराष्ट्राची समृद्ध जंगले परप्रांतीय कंपन्यांच्या घशात घालणाऱ्यांवर प्रहार’; कर्जतच्या सभेतून राज ठाकरेंचा सरकारला इशारा!‘घरखरेदीदारांवर बँक ईएमआय आणि भाड्याचा दुहेरी फटका’; २१० प्रकल्पांना मुदतवाढ दिल्याने महारेराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
Home पिंपरी चिंचवड ‘तडीपारीचा आदेश धुडकावून पिस्तूल घेऊन फिरणाऱ्यांवर गुन्हे शाखेची कारवाई’; देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

‘तडीपारीचा आदेश धुडकावून पिस्तूल घेऊन फिरणाऱ्यांवर गुन्हे शाखेची कारवाई’; देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ०१ ची धडाकेबाज कामगिरी; ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

तडीपार गुन्हेगार जेैलबंद! पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ ची धडक कारवाई; दापोडीतील सराईत गुन्हेगार साथीदारासह पिस्तूलसह ताब्यात!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: आयुक्तालय हद्दीत गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने अत्यंत धडक कारवाई केली आहे. हद्दीतून तडीपार असलेला एक सराईत गुन्हेगार आपल्या साथीदारासह बेकायदेशीरपणे पिस्तूल हे घातक अग्निशस्त्र बाळगून दहशत माजवण्यासाठी आला असल्याची गोपनिय माहिती युनिट ०१ च्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी दोघा तडीपार व सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ०१ चे पथक पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना, सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत भिसे यांना त्यांच्या खास बातमीदारा मार्फत अत्यंत खात्रीशीर बातमी मिळाली.
दापोडी पोलीस स्टेशनचा रेकॉर्डवरील तडीपार आरोपी अनिकेत उर्फ सोन्या अशोक बाराथे (वय २५, रा. शिवाजी पुतळ्याच्या मागे, बाराथेवस्ती, दापोडी, पुणे) हा त्याचा साथीदार निरज महावीर साळवे (वय २४, रा. एस.एम.एस. कॉलनी, दापोडी, पुणे) याच्यासह देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-पुणे जुन्या महामार्गालगत असलेल्या ‘हॉटेल पुनागेट’समोरील मोकळ्या जागेत पिस्तूल हे अग्निशस्त्र बाळगून थांबला आहे.
सदर बातमी मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन सापळा रचला आणि रेकी करून छापा टाकला. वर्णनानुसार दोन संशयित इसम जागेवरच असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे ५१,००० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल मॅक्झिनसह आणि एक जिवंत काडतूस मिळून आले.
चौकशीदरम्यान निष्पन्न झाले की, मुख्य आरोपी अनिकेत उर्फ सोन्या अशोक बाराथे यास मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०१ यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१)(ब) प्रमाणे तडीपार आदेश क्रमांक ५२/२०२६ अन्वये दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी दोन वर्षांकरिता पुणे शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार केले होते. असे असतानाही तो बेकायदेशीरपणे आयुक्तालय हद्दीत दाखल झाला होता. तसेच, मा. सह पोलीस आयुक्त यांच्याकडून पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीत शस्त्र व अग्निशस्त्र बाळगण्यास मनाई करणारे आदेश लागू असतानाही, त्याचे उल्लंघन करून आरोपींनी हत्यार बाळगले होते.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ आणि मपोका कलम १४२ अन्वये सरकारतर्फे फिर्याद देण्यात आली आहे. आरोपींची वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत वैद्यकीय तपासणी करून, जप्त केलेल्या मुद्देमालासह त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी देहूरोड पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदारांकडे हजर करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई गुन्हे शाखा युनिट ०१ चे पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत भिसे, पोलीस हवालदार अजय डगळे, महादेव जावळे, शिवराम भोपे, पोलीस कॉन्स्टेबल उद्धव खेडकर आणि तेजस भालचिम यांच्या पथकाने पार पाडली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!