news
‘चौकशी समिती कागदावरच, शिक्षण विभाग शाळा व्यवस्थापनाचे हितसंबंध जोपासतंय का?’; ॲड. उमेश खंदारे यांचा थेट सवाल!‘शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखेंच्या वारशाचा विजय’; पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांची बाजी!‘प्रवाशांची सुरक्षा अन् रिक्षाचालकांचा रोजगार’; पिंपरी-चिंचवडमध्ये विनापरवाना चालणाऱ्या बाईक टॅक्सींवर आरटीओचा दणका!‘महाराष्ट्राची समृद्ध जंगले परप्रांतीय कंपन्यांच्या घशात घालणाऱ्यांवर प्रहार’; कर्जतच्या सभेतून राज ठाकरेंचा सरकारला इशारा!‘घरखरेदीदारांवर बँक ईएमआय आणि भाड्याचा दुहेरी फटका’; २१० प्रकल्पांना मुदतवाढ दिल्याने महारेराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
Home मुख्यपृष्ठ ‘महाराष्ट्राची समृद्ध जंगले परप्रांतीय कंपन्यांच्या घशात घालणाऱ्यांवर प्रहार’; कर्जतच्या सभेतून राज ठाकरेंचा सरकारला इशारा!

‘महाराष्ट्राची समृद्ध जंगले परप्रांतीय कंपन्यांच्या घशात घालणाऱ्यांवर प्रहार’; कर्जतच्या सभेतून राज ठाकरेंचा सरकारला इशारा!

“गुजरातच्या कंपनीसाठी महाराष्ट्राचा निसर्ग उद्ध्वस्त होऊ देणार नाही”; स्थानिक आदिवासी व ग्रामस्थांशी साधला थेट संवाद | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सह्याद्रीच्या कत्तलीविरोधात राज ठाकरेंचा आक्रमक पवित्रा; कर्जतमधील वृक्षतोडीची केली पाहणी, सायंकाळच्या सभेत सरकारवर धडक तोफ धडाडणार!

कर्जत / पिंपरी प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २८ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

कर्जत: रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पालीतर्फे कोथल-खलाटी आणि भीमाशंकर परिसरातील समृद्ध जंगलात सुरू असलेल्या अथांग वृक्षतोडीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गुजरातच्या एका खाजगी टोरेंट कंपनीच्या वीज प्रकल्पासाठी केल्या जाणाऱ्या या वृक्षतोडीवरून आक्रमक झालेल्या राज ठाकरेंनी आज सायंकाळी ५ वाजता कर्जत येथे आयोजित जाहीर सभेत सरकारविरोधात जोरदार तोफ डागण्याची तयारी केली आहे.

आज सकाळी ठरलेल्या दौऱ्यानुसार राज ठाकरे यांनी कर्जत तालुक्यातील साईडोंगर आणि भीमाशंकर परिसरातील ज्या भागात टोरेंट हायड्रो-इलेक्ट्रिक प्रकल्पासाठी वृक्षतोड सुरू आहे, त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली.
या प्रकल्पासाठी तब्बल ३२,४८० हून अधिक झाडे तोडली जात असून, प्रत्यक्षात २,०७५ हून अधिक जुनी व औषधी झाडे कापली गेल्याचे पाहणीदरम्यान स्पष्ट झाले.  या प्रकल्पांमुळे विस्थापित होणारे स्थानिक आदिवासी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी आपल्या शेकडो वर्षांच्या जुन्या वस्त्या, देवराई आणि पर्यावरणाचे होणारे नुकसान राज ठाकरेंसमोर मांडले. स्थानिकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर राज ठाकरेंनी प्रशासकीय अधिकार्‍यांचीही कानउघाडणी केली.

 

सकाळच्या स्थळपाहणीनंतर सायंकाळी ५ वाजता कर्जत येथील पोलीस ग्राउंडवर राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडत आहे. या सभेत ते नेमके काय बोलणार आणि सरकारला कोणता अल्टिमेटम देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सभेमध्ये खालील प्रमुख मुद्द्यांवर प्रखर भाष्य होण्याची शक्यता आहे:
 ग्रामपंचायतींचा किंवा स्थानिकांचा कोणताही विरोध असताना किंवा ठराव नसताना हा प्रकल्प लादल्याबद्दल राज्य सरकारवर कडक टीका.  गुजरातच्या कंपनीच्या फायद्यासाठी महाराष्ट्रातील पर्यावरणाचा घात केला जात असल्याचा गंभीर आरोप. वृक्षतोड तात्काळ थांबवली नाही, तर मनसे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभा करेल, असा इशारा या सभेत दिला जाण्याची दाट शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे रायगडमधील राजकारण तापले असून, सत्तेतील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!