news
‘आठ दिवसांचा अल्टीमेटम, अन्यथा आरटीओ व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या’; काशिनाथ नखाते यांचा प्रशासनाला इशारा!‘चौकशी समिती कागदावरच, शिक्षण विभाग शाळा व्यवस्थापनाचे हितसंबंध जोपासतंय का?’; ॲड. उमेश खंदारे यांचा थेट सवाल!‘शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखेंच्या वारशाचा विजय’; पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांची बाजी!‘प्रवाशांची सुरक्षा अन् रिक्षाचालकांचा रोजगार’; पिंपरी-चिंचवडमध्ये विनापरवाना चालणाऱ्या बाईक टॅक्सींवर आरटीओचा दणका!‘महाराष्ट्राची समृद्ध जंगले परप्रांतीय कंपन्यांच्या घशात घालणाऱ्यांवर प्रहार’; कर्जतच्या सभेतून राज ठाकरेंचा सरकारला इशारा!
Home पिंपरी चिंचवड ‘आठ दिवसांचा अल्टीमेटम, अन्यथा आरटीओ व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या’; काशिनाथ नखाते यांचा प्रशासनाला इशारा!

‘आठ दिवसांचा अल्टीमेटम, अन्यथा आरटीओ व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या’; काशिनाथ नखाते यांचा प्रशासनाला इशारा!

रॅपिडो, उबर अन् ओलावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी; कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालक संघर्ष महासंघ आक्रमक | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

बेकायदेशीर बाईक टॅक्सी कंपन्यांवर गुन्हे दाखल करून अ‍ॅप्स बंद करा! — काशिनाथ नखाते

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २८ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोणताही वैध परवाना नसताना सर्रास सुरू असलेल्या बाईक टॅक्सी कंपन्यांवर थेट गुन्हे दाखल करून त्यांची वाहने जप्त करावीत, तसेच या कंपन्यांचे अ‍ॅप्स बंद करण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालक संघर्ष महासंघाने केली आहे. येत्या आठ दिवसांत प्रशासनाने यावर ठोस कारवाई केली नाही, तर पुणे व पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालय (RTO) आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी दिला आहे.
कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालक संघर्ष महासंघाच्या वतीने आज थरमॅक्स चौक, चिंचवड येथे शहरभरातील रिक्षाचालकांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस निमंत्रक नाना कसबे, संघटक विशाल सरवदे, सचिन मुरगुंड, बाबासाहेब सरवदे, राजू होनमाने, दादा खांडेकर, राजू बोराडे, किशोर टोणपे, मनोज घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे (RTO) यांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत वृत्तनिवेदनात ‘रॅपीडो’ (Rapido) कंपनीकडे वैध बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर परवाना नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत रॅपीडो, उबेर (Uber) आणि ओला (Ola) यांसारख्या कंपन्यांकडून बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सी चालवल्या जात असल्याचा गंभीर आरोप महासंघाने केला आहे.
या अनधिकृत वाहतुकीमुळे प्रामाणिकपणे आणि नियमांचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या लाखो रिक्षा व टॅक्सी चालकांच्या उपजीविकेवर गदा येत आहे. तसेच, विनापरवाना व व्यावसायिक विमा नसलेल्या या वाहनांमुळे प्रवाशांच्या जिवाचा व सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे नखाते यांनी नमूद केले.
विनापरवाना आणि नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या या बाईक टॅक्सी कंपन्यांवर तसेच संबंधित वाहनांवर सायबर क्राईम विभागातर्फे आणि पोलिसांत फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर पावले उचलावीत, अशी मागणी चिंचवड येथील बैठकीत एकमुखाने करण्यात आली.
“कायद्याचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या पोटावर पाय येत असताना प्रशासनाने डोळेझाक करू नये. विनापरवाना बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपन्यांवर केवळ नावाला नव्हे तर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल करून वाहने जप्त केली पाहिजेत. पुढील आठ दिवसांत ही बेकायदेशीर सेवा बंद न झाल्यास आरटीओ आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल.”
— काशिनाथ नखाते (अध्यक्ष, कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालक संघर्ष महासंघ)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!