news
‘पाणी तुंबणाऱ्या भागांची प्रत्यक्ष पाहणी करून तत्काळ उपाययोजना राबवा’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश!‘पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन’; लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची उपस्थिती!‘फुटपाथ कनेक्टिव्हिटी आणि व्हिजिबल क्लीनलिनेसवर विशेष भर द्या’; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!‘महापालिका रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वेळेत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा मिळालीच पाहिजे’; महापौर रवि लांडगे यांचा प्रशासनाला स्पष्ट इशारा!‘रंगमंचाच्या माध्यमातून कलेची नाळ जपली जाते, महापालिकेची साथ कौतुकास्पद’; समर नखाते यांचे मनोगत!
Home पिंपरी चिंचवड ‘पाणी तुंबणाऱ्या भागांची प्रत्यक्ष पाहणी करून तत्काळ उपाययोजना राबवा’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश!

‘पाणी तुंबणाऱ्या भागांची प्रत्यक्ष पाहणी करून तत्काळ उपाययोजना राबवा’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश!

मधुकर पवळे सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे आदेश; अतिरिक्त आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: चिखली घरकुल प्रकल्प परिसरात पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांना आणि त्यांच्या मालमत्तेला होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नाला बांधणीचे काम आणि पर्यायी पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कामांना अधिक गती देऊन आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, शहरातील इतर भागांमध्ये पावसामुळे पाणी साचण्याची समस्या उद्भवली होती, अशा ठिकाणीही पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध नागरी समस्या, पायाभूत सुविधा आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) आयोजित महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते.

चिखली घरकुल आणि शहरातील इतर भागांतील जलनिचरा व्यवस्थेबाबत बैठकीत पुढील निर्देश देण्यात आले.  चिखली घरकुल परिसरात पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्यास पाणी साचून मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन नाला बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. सोबतच पाण्याचा पर्यायी निचरा करण्याचेही नियोजन करण्यात आले असून, या कामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. शहरातील ज्या भागांमध्ये पावसाळ्यात पाणी साचण्याच्या व तुंबण्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या, त्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात. नियोजित कामे वेगाने पूर्ण करून पुढील पावसाळ्यातील संभाव्य समस्या टाळण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मनोज सेठिया, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, उपआयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, सिताराम बहुरे, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप, तसेच क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, निवेदिता घार्गे, परशुराम वाघमोडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!