news
‘आपल्या नावावर किती मोबाइल क्रमांक सुरू आहेत याची नियमित तपासणी करा’; अनोळखी व्यक्तीस सिम दिल्यास मूळ ग्राहकावरही कायदेशीर जबाबदारी!‘सांस्कृतिक भवनातून श्रमिकांचे व कुटुंबीयांचे हित जपले जावे’; मेळाव्यात मान्यवरांचे मनोगत व एकत्र लढ्याचा निर्धार!‘मोशी दुर्घटनेनंतरही वाढदिवस टाळून दुर्घटनाग्रस्तांना दिली होती साथ’; सेवाभावाचा आदर्श जपणाऱ्या महापौर लांडगे यांची पुन्हा एकदा कृतीशील पावले!‘पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांच्या आधुनिक शिक्षणपद्धतीची जागतिक पातळीवर दखल’; अॅडियन व युनिसेफ शिष्टमंडळाकडून उपक्रमांचे कौतुक!‘कंत्राटी कामगारांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद आणि पारदर्शक देयक प्रणाली राबवा’; पिंपरी-चिंचवड मनपात शिष्टमंडळाची मागणी!
Home पिंपरी चिंचवड ‘पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील व पीसीईटी विश्वस्तांकडून संविधान दिनाच्या शुभेच्छा’; लोकशाही मूल्ये जपण्याची विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा!

‘पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील व पीसीईटी विश्वस्तांकडून संविधान दिनाच्या शुभेच्छा’; लोकशाही मूल्ये जपण्याची विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा!

कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांच्या उपस्थितीत संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन; प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड विद्यापीठात संविधान दिन उत्साहात; प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन व ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २७ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड विद्यापीठामध्ये (PCU) गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांच्या समवेत संविधानातील सार्वभौमत्व, अखंडता व लोकशाही मूल्यांचे जतन करीत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांचे प्रामाणिक आचरण करण्याची प्रतिज्ञा सर्वांनी घेतली.

पीसीयू ग्रंथालय विभाग आणि स्कूल ऑफ लॉ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. संविधानाविषयी अधिक जनजागृती व्हावी या उद्देशाने प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच, पीसीयू मध्यवर्ती ग्रंथालयात संविधान व कायदेविषयक विशेष ग्रंथ आणि दस्तऐवजांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी आशिष देशपांडे यांनी ‘संविधान मार्गदर्शक’ या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. शासन व्यवस्था, नागरिकत्व आणि सामाजिक प्रगतीसाठी भारतीय संविधान हा एक अमूल्य दस्तऐवज आहे.  कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे चार प्रमुख स्तंभ असून, संवैधानिक हक्क, मूलभूत कर्तव्ये आणि सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी युवा वर्गाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या निमित्ताने पीसीयूचे कुलपती तथा पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, पीसीयू व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्वांना संविधान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!