news
‘आपल्या नावावर किती मोबाइल क्रमांक सुरू आहेत याची नियमित तपासणी करा’; अनोळखी व्यक्तीस सिम दिल्यास मूळ ग्राहकावरही कायदेशीर जबाबदारी!‘सांस्कृतिक भवनातून श्रमिकांचे व कुटुंबीयांचे हित जपले जावे’; मेळाव्यात मान्यवरांचे मनोगत व एकत्र लढ्याचा निर्धार!‘मोशी दुर्घटनेनंतरही वाढदिवस टाळून दुर्घटनाग्रस्तांना दिली होती साथ’; सेवाभावाचा आदर्श जपणाऱ्या महापौर लांडगे यांची पुन्हा एकदा कृतीशील पावले!‘पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांच्या आधुनिक शिक्षणपद्धतीची जागतिक पातळीवर दखल’; अॅडियन व युनिसेफ शिष्टमंडळाकडून उपक्रमांचे कौतुक!‘कंत्राटी कामगारांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद आणि पारदर्शक देयक प्रणाली राबवा’; पिंपरी-चिंचवड मनपात शिष्टमंडळाची मागणी!
Home पिंपरी चिंचवड ‘कंत्राटी कामगारांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद आणि पारदर्शक देयक प्रणाली राबवा’; पिंपरी-चिंचवड मनपात शिष्टमंडळाची मागणी!

‘कंत्राटी कामगारांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद आणि पारदर्शक देयक प्रणाली राबवा’; पिंपरी-चिंचवड मनपात शिष्टमंडळाची मागणी!

शिवसेना पुणे जिल्हा संघटक संतोष सौंदणकर यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांना निवेदन; सुमित कांबळे, सुरज भराटे व सुभाष मालुसरे यांची उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कंत्राटी कामगारांची चारित्र्य पडताळणी व बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करा; संतोष सौंदणकर यांची मागणी!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २७ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटदारांमार्फत नियुक्त करण्यात येणाऱ्या कंत्राटी कामगारांची नियुक्तीपूर्वी अनिवार्य चारित्र्य पडताळणी करण्यात यावी, तसेच प्रत्येक कामगारासाठी बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली लागू करून त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यावे, अशी मागणी शिवसेना पुणे जिल्हा संघटक संतोष सौंदणकर यांनी निवेदनाद्वारे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्याकडे केली आहे.

महानगरपालिकेच्या स्वच्छता, सुरक्षा, आरोग्य, उद्यान, पाणीपुरवठा आणि विद्युत विभागांमध्ये निविदा प्रक्रियेद्वारे मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. मात्र, या कामगारांची चारित्र्य पडताळणी होते की नाही आणि कागदोपत्री दाखवले जाणारे कामगार प्रत्यक्षात कामावर असतात की नाही, यावर प्रभावी नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कागदोपत्री व प्रत्यक्ष उपस्थितीतील तफावतीमुळे आर्थिक अनियमितता होऊन सार्वजनिक निधीचा अपव्यय होण्याची शक्यता व्यक्त करत प्रत्येक कामगाराची नियुक्तीपूर्वी पोलीस यंत्रणेमार्फत चारित्र्य पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनाद्वारे प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येक कामगाराची बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करावी; कामाचे ठिकाण, वेळ आणि दैनंदिन उपस्थितीची डिजिटल नोंद ठेवावी. बायोमेट्रिक उपस्थितीची पडताळणी केल्याशिवाय कंत्राटदारांची देयके अदा करू नयेत. कंत्राटदारांनी कामगारांची अद्ययावत नामावली, छायाचित्र, ओळखपत्र व चारित्र्य पडताळणीचा तपशील महापालिकेकडे जमा करणे बंधनकारक करावे. बनावट हजेरी, वाढीव संख्या दाखवणे किंवा अनुपस्थित कामगारांची नावे नोंदवणे असे प्रकार आढळल्यास दंडात्मक कारवाई करून करार रद्द करणे व काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करावी. नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या सर्व निविदांमध्ये या अटींचा स्पष्ट समावेश करावा आणि संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी.

नागरिकांच्या करातून जमा होणारा सार्वजनिक निधी जनतेच्या हितासाठीच खर्च व्हावा आणि नियुक्ती, उपस्थिती व देयकांच्या प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हे निवेदन देताना शिवसेना पुणे जिल्हा संघटक संतोष सौंदणकर यांच्यासह सुमित कांबळे, सुरज भराटे आणि सुभाष मालुसरे उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!