news
‘आपल्या नावावर किती मोबाइल क्रमांक सुरू आहेत याची नियमित तपासणी करा’; अनोळखी व्यक्तीस सिम दिल्यास मूळ ग्राहकावरही कायदेशीर जबाबदारी!‘सांस्कृतिक भवनातून श्रमिकांचे व कुटुंबीयांचे हित जपले जावे’; मेळाव्यात मान्यवरांचे मनोगत व एकत्र लढ्याचा निर्धार!‘मोशी दुर्घटनेनंतरही वाढदिवस टाळून दुर्घटनाग्रस्तांना दिली होती साथ’; सेवाभावाचा आदर्श जपणाऱ्या महापौर लांडगे यांची पुन्हा एकदा कृतीशील पावले!‘पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांच्या आधुनिक शिक्षणपद्धतीची जागतिक पातळीवर दखल’; अॅडियन व युनिसेफ शिष्टमंडळाकडून उपक्रमांचे कौतुक!‘कंत्राटी कामगारांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद आणि पारदर्शक देयक प्रणाली राबवा’; पिंपरी-चिंचवड मनपात शिष्टमंडळाची मागणी!
Home पिंपरी चिंचवड ‘राष्ट्रीय एकात्मता, समानता आणि सामाजिक न्यायाचा विचार सर्व घटकांपर्यंत पोहोचवा’; पिंपरी-चिंचवड महापालिकेत संविधान दिन साजरा!

‘राष्ट्रीय एकात्मता, समानता आणि सामाजिक न्यायाचा विचार सर्व घटकांपर्यंत पोहोचवा’; पिंपरी-चिंचवड महापालिकेत संविधान दिन साजरा!

मुख्य प्रशासकीय इमारतीत उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण; संविधानातील मूल्ये अंगीकृत करण्याचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २७ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण करत उपस्थितांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केला. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून महापालिकेत स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूलभूत मूल्यांचा जागर करण्यात आला. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार, समानता आणि सामाजिक न्यायाचा विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या की, लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी संविधानाने दिलेल्या मूल्यांचे प्रत्येकाने केवळ स्मरण न करता ती अंगीकृत करणे आवश्यक आहे. समाजातील सर्व घटकांना समान संधी, न्याय आणि सन्मान मिळावा तसेच राष्ट्रीय एकात्मता व बंधुभावाची भावना अधिक दृढ व्हावी, यासाठी संविधानाप्रती आपली जबाबदारी जपणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला नगररचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे, सहआयुक्त मनोज लोणकर, सहशहर अभियंता विनय ओहोळ, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बुकतर, तुकाराम गायकवाड, संतोष सुरवसे, सचिन खरात, पिंटू जामदार, गणेश पुंडा आणि वैभव भालेराव यांचीही यावेळी उपस्थिती होती.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!