news
‘आपल्या नावावर किती मोबाइल क्रमांक सुरू आहेत याची नियमित तपासणी करा’; अनोळखी व्यक्तीस सिम दिल्यास मूळ ग्राहकावरही कायदेशीर जबाबदारी!‘सांस्कृतिक भवनातून श्रमिकांचे व कुटुंबीयांचे हित जपले जावे’; मेळाव्यात मान्यवरांचे मनोगत व एकत्र लढ्याचा निर्धार!‘मोशी दुर्घटनेनंतरही वाढदिवस टाळून दुर्घटनाग्रस्तांना दिली होती साथ’; सेवाभावाचा आदर्श जपणाऱ्या महापौर लांडगे यांची पुन्हा एकदा कृतीशील पावले!‘पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांच्या आधुनिक शिक्षणपद्धतीची जागतिक पातळीवर दखल’; अॅडियन व युनिसेफ शिष्टमंडळाकडून उपक्रमांचे कौतुक!‘कंत्राटी कामगारांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद आणि पारदर्शक देयक प्रणाली राबवा’; पिंपरी-चिंचवड मनपात शिष्टमंडळाची मागणी!
Home पिंपरी चिंचवड ‘मोशी दुर्घटनेनंतरही वाढदिवस टाळून दुर्घटनाग्रस्तांना दिली होती साथ’; सेवाभावाचा आदर्श जपणाऱ्या महापौर लांडगे यांची पुन्हा एकदा कृतीशील पावले!

‘मोशी दुर्घटनेनंतरही वाढदिवस टाळून दुर्घटनाग्रस्तांना दिली होती साथ’; सेवाभावाचा आदर्श जपणाऱ्या महापौर लांडगे यांची पुन्हा एकदा कृतीशील पावले!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मदतकार्याला बळ देण्याचा उद्देश; पिंपरी-चिंचवडमध्ये सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमाची चर्चा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

माणुसकीचा हात, सामाजिक बांधिलकीची साथ; महापौर रवि लांडगे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाखांची मदत!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २७ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: समाजातील दुःख आणि वेदनांची जाणीव ठेवून संकटाच्या काळात मदतीसाठी पुढे येणे, हीच माणुसकीची खरी ओळख आहे. याच सामाजिक भावनेतून पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. यावेळी युवा उद्योजक शिवराज काटे उपस्थित होते. शिवराज काटे यांचा वाढदिवस असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

राज्यातील संकटग्रस्त नागरिकांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मदतकार्याला बळ देण्याच्या उद्देशाने महापौर रवि लांडगे यांनी ही आर्थिक मदत केली आहे.

यापूर्वीही मोशी येथील दुर्दैवी दुर्घटनेनंतर महापौर लांडगे यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात दिला होता. स्वतःच्या आनंदापेक्षा इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवत त्यांनी जपलेली ही सामाजिक बांधिलकी आजच्या कृतीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना विकासकामांबरोबरच सामाजिक भान जपणे, गरजूंच्या वेदना समजून घेणे आणि संकटाच्या प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संकटग्रस्तांना आधार देण्यासाठी पुढे आलेला प्रत्येक हात मोलाचा ठरत असून, अशा उपक्रमांमुळे समाजात माणुसकी आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण होतो.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!