news
‘आपल्या नावावर किती मोबाइल क्रमांक सुरू आहेत याची नियमित तपासणी करा’; अनोळखी व्यक्तीस सिम दिल्यास मूळ ग्राहकावरही कायदेशीर जबाबदारी!‘सांस्कृतिक भवनातून श्रमिकांचे व कुटुंबीयांचे हित जपले जावे’; मेळाव्यात मान्यवरांचे मनोगत व एकत्र लढ्याचा निर्धार!‘मोशी दुर्घटनेनंतरही वाढदिवस टाळून दुर्घटनाग्रस्तांना दिली होती साथ’; सेवाभावाचा आदर्श जपणाऱ्या महापौर लांडगे यांची पुन्हा एकदा कृतीशील पावले!‘पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांच्या आधुनिक शिक्षणपद्धतीची जागतिक पातळीवर दखल’; अॅडियन व युनिसेफ शिष्टमंडळाकडून उपक्रमांचे कौतुक!‘कंत्राटी कामगारांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद आणि पारदर्शक देयक प्रणाली राबवा’; पिंपरी-चिंचवड मनपात शिष्टमंडळाची मागणी!
Home पिंपरी चिंचवड ‘अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव ठेवून लोकशाही अधिक सक्षम करा’; ‘संविधान सन्मान दौड २०२६’मध्ये मान्यवरांचे आवाहन!

‘अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव ठेवून लोकशाही अधिक सक्षम करा’; ‘संविधान सन्मान दौड २०२६’मध्ये मान्यवरांचे आवाहन!

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ; लोकप्रतिनिधी, प्रशासन, विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान! ‘संविधान सन्मान दौड २०२६’ला पिंपरी-चिंचवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २७ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: भारतीय संविधानाप्रती आदर, लोकशाही मूल्यांप्रती बांधिलकी आणि जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संविधान सन्मान दौड २०२६’ गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या संविधान दौडीला शहरवासीय, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या संविधान सन्मान दौडीची सुरुवात चिंचवड स्टेशन येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि थोर क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून झाली. देशभक्तीपर गीतांनी वातावरणात चैतन्य निर्माण झाल्यानंतर, महापौर रवि लांडगे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा (फ्लॅग ऑफ) दाखवून दौडीचा शुभारंभ केला.

दौडीदरम्यान नागरिकांनी संविधानाच्या विचारांचा जागर केला. पिंपरी येथील भीमसृष्टी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यानंतर जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले आणि उपस्थितांनी सामूहिक वाचन करत दौडीचा समारोप केला. या उपक्रमासोबतच “पाणी वाचवा, भविष्य घडवा” तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत स्वच्छ, सुंदर, हरित आणि शाश्वत पिंपरी-चिंचवड घडविण्याचा संकल्पही करण्यात आला.

प्रत्येक नागरिकाने संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव ठेवून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी योगदान द्यावे. संविधानाचा सन्मान राखणे ही प्रत्येक भारतीयाची सामूहिक जबाबदारी असून, या दौडीमुळे नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही अमूल्य तत्त्वे प्रत्येक नागरिकाने आचरणात आणणे आवश्यक असून, जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने योगदान द्यावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. – आमदार शंकर जगताप

या दौडीमध्ये महापौर रवि लांडगे, आमदार शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे, निखिल बोऱ्हाडे, आरती चौधे, सविता खुळे यांच्यासह नगरसदस्य शत्रुघ्न बापू काटे, तुषार हिंगे, बाबासाहेब त्रिभुवन, कुणाल वाव्हळकर, सुरेश भोईर, धर्मपाल तंतरपाळे, माऊली जगताप, विशाल कलाटे, डॉ. सुहास कांबळे, शामराव जगताप, जगन्नाथ काटे, नगरसदस्या सुलभा उबाळे, शैलजा मोरे, मनिषा भोईर, नीता पाडळे, सारिका गायकवाड, सारिका मासुळकर, पल्लवी जगताप, रेश्मा भुजबळ, स्नेहा कलाटे, शालिनीताई गुजर सहभागी झाले होते.

तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे, सहआयुक्त मनोज लोणकर, सहशहर अभियंता बापू गायकवाड, प्रेरणा सिनकर, संध्या वाघ, उपायुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपअग्निशमन अधिकारी गौतम इंगवले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!