news
‘मुंडे साहेबांचे’ सामाजिक न्यायाचे कार्य प्रेरणादायी! रहाटणीच्या छत्रपती चौकात लोकनेत्याला वंदन‘अधिकाऱ्यांनीच नोंदणी करण्यास नकार द्यायला हवा होता!’ पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन व्यवहारावर अजित पवारांचे मोठे विधान‘बाबू गेनूं’चे शौर्य स्वातंत्र्य लढ्याला निर्णायक दिशा देणारे! वयाच्या २२ व्या वर्षी दिलेल्या बलिदानाला महापालिकेकडून अभिवादनगरजू नागरिकांना घराची मालकी मिळणार! अमरावतीत ५००० पेक्षा जास्त अतिक्रमणे नियमात; ‘प्रधानमंत्री आवास’ आणि ‘रमाई’ योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळाहिंजवडीत हॉटेल भाड्यावरून वाद पेटला! जयहिंद अर्बन बँकेचे संचालक अजिंक्य विनोदे यांच्यावर जीवघेणा हल्ला; सराईत आरोपी सुमित संदानशिवला जामीन नाकारला
Home गुन्हेगारी सिगारेटसाठी गेला जीव!

सिगारेटसाठी गेला जीव!

पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणाची सिमेंट ब्लॉकने हत्या; आरोपी अटकेत.

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सिगारेटच्या कारणावरून खून! पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणाची सिमेंट ब्लॉकने हत्या (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी-चिंचवड)

संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; एका आरोपीला अटक.

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील विठ्ठलनगर परिसरात सिगारेट मागण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अक्षय संजय ठोके असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलिसांनी विश्वास भिमा शिंदे (वय २८) या आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वंदना संजय ठोके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३१ मे २०२५ रोजी सकाळी ११ ते १ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने अक्षय ठोके याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासादरम्यान, पोलिसांनी विश्वास शिंदे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सांगितले की, सिगारेट मागण्याच्या कारणावरून त्याचे अक्षय ठोकेसोबत भांडण झाले. भांडणात अक्षयने विश्वासला सिमेंट ब्लॉक मारून फेकला, जो त्याने चुकवला. त्यानंतर विश्वासने त्रिकोणी आकाराचा सिमेंट ब्लॉक अक्षयच्या डोक्यात तीन ते चार वेळा मारून त्याची हत्या केली.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी विश्वास शिंदे याला अटक केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोरख कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या घटनेमुळे विठ्ठलनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सध्या परिस्थिती शांत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

या संदर्भातील अधिक माहितीसाठी ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’ सोबत राहा.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!