news
Home पुणे पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी: अवैध गॅस रिफिलिंग रॅकेट उद्ध्वस्त!

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी: अवैध गॅस रिफिलिंग रॅकेट उद्ध्वस्त!

संदिप सूर्यवंशीला अटक, १.५७ लाखांचा धोकादायक गॅस साठा जप्त; दिघी पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दिघी पोलिसांची मोठी कारवाई: पठारेमळा परिसरात जीवघेण्या अवैध्य गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश!

लाखोंच्या किंमतीचा गॅस साठा जप्त; मानवी जीविताला धोका निर्माण करणाऱ्या आरोपीला अटक!

पुणे, १६ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): पुणे ग्रामीण पोलिसांनी नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या एका मोठ्या अवैध्य गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. काल, १५ जून २०२५ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास, हवेली तालुक्यातील पठारेमळा, चूहोली बुद्रुक येथे ही कारवाई करण्यात आली. दिघी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात लाखोंच्या किंमतीचा अवैध्य गॅस साठा आणि साहित्य जप्त करण्यात आले असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.


बेकायदेशीर रिफिलिंग आणि मानवी जीविताशी खेळ!

पोलीस कॉन्स्टेबल उमेश दिलीप कसबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी संदिप रामराव सुर्यवंशी (वय २५) हा गणेश सावंत यांच्या चालू बांधकाम असलेल्या घराच्या मागे मोकळ्या जागेत हा बेकायदेशीर धंदा करत होता. संदिप सुर्यवंशी हा घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या गॅस सिलिंडरची विनापरवाना व्यावसायिक सिलिंडरमधून घरगुती सिलिंडरमध्ये रिफिलिंग किटच्या (संकीट) सहाय्याने धोकादायक पद्धतीने करत होता. या प्रक्रियेत कोणतीही सुरक्षिततेची काळजी घेतली जात नव्हती. अतिशय ज्वालाग्रही पदार्थ हाताळताना लोकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, हे माहीत असूनही त्याने पुरेसा बंदोबस्त करण्याची जबाबदारी जाणिवपूर्वक टाळली.


१.५७ लाखांचा अवैध गॅस साठा जप्त, आरोपीला अटक!

लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी कृती करून, अवैधरित्या गॅस ट्रान्सफर करून तो गॅस भरलेल्या टाक्या चढे दराने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विकण्याचा आरोपीचा उद्देश होता. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण १,५७,२९२/- रुपये किंमतीचा अवैध्य गॅस साठा आणि गॅस ट्रान्सफर करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. आरोपी संदिप रामराव सुर्यवंशीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.


दिघी पोलिसांनी ही कारवाई भा.न्या.सं. कलम २८७, २८८ सह जीवनावष्यक वस्तूचा कायदा १९५५ चे कलम ३, ७ अन्वये केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बहिरट हे करत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!