news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री ‘गुंडांचा हैदोस’: ‘आम्ही येथील भाई आहोत’ म्हणत रिक्षाचालकावर हल्ला!

पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री ‘गुंडांचा हैदोस’: ‘आम्ही येथील भाई आहोत’ म्हणत रिक्षाचालकावर हल्ला!

बालाजीनगरमध्ये दहशत, पैशांची लूट आणि तोडफोड; एमआयडीसी भोसरी पोलिसांची धडक कारवाई, तीन आरोपी जेरबंद. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भोसरीमध्ये ‘भाई’गिरीचा थरार: रिक्षाचालकाला धमकावून पैसे लुटले, गाडी फोडली!

हातात कोयते फिरवत परिसरात दहशत; एमआयडीसी भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, विधीसंघर्षीत बालकावरही गुन्हा!

पिंपरी-चिंचवड, १६ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुणांनी ‘भाई’गिरीचा वापर करत एका रिक्षाचालकाला धमकावून पैसे लुटले आणि त्याची गाडी फोडली. हातात लोखंडी कोयते फिरवत त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, यातील तिघा आरोपींना अटक केली असून, एका विधीसंघर्षीत बालकावरही गुन्हा दाखल केला आहे.


बालजीनगरमध्ये मध्यरात्री घडला प्रकार: ‘गाडी लावायची असेल तर पैसे दे!’

दिनांक १५ जून २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास, बालाजीनगर, भोसरी येथे ही घटना घडली. फिर्यादी रोहित अरुण गायकवाड (वय २७, रिक्षाचालक) हे त्यांच्या गाडीजवळ असताना आरोपी अशोक गोंधणे (वय २०), रोहीत पारवे (वय २१), अरुण गोटे (वय २२) आणि एक विधीसंघर्षीत बालक हे तिथे आले. त्यांनी रोहितला, “मादरचोद येथे गाडी लावायची नाही, जर गाडी लावायची असेल तर पैसे दे!” अशी धमकी दिली.


पैसे लुटले, गाडी फोडली अन् कोयते फिरवत परिसरात दहशत!

या धमकीनंतर आरोपी क्र. १ अशोक गोंधणे आणि आरोपी क्र. २ रोहीत पारवे यांनी जबरदस्तीने रोहितच्या पॅन्टच्या खिशातून ५०० रुपये काढून घेतले. यानंतर आरोपी क्र. ३ अरुण गोटे आणि विधीसंघर्षीत बालकाने त्यांच्या हातातील लोखंडी कोयते रोहितच्या गाडीवर आपटून गाडीचे नुकसान केले आणि लाथांनी गाडी खाली पाडून तोडफोड केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी त्यांच्या हातातील कोयते हवेत फिरवत तिथे जमलेल्या लोकांकडे इशारा केला आणि, “आम्ही येथील भाई आहोत, कोणी पोलीसात तक्रार केली तर आंम्हाला जो नडला त्याला कायमचा तोडला” अशी उघड धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.


एमआयडीसी भोसरी पोलिसांची धडक कारवाई: तिघांना अटक!

या घटनेनंतर फिर्यादी रोहित गायकवाड यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत, आरोपी अशोक गोंधणे, रोहीत पारवे आणि अरुण गोटे या तिघांना अटक केली आहे. तसेच, या घटनेत सहभागी असलेल्या विधीसंघर्षीत बालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३२४ (४), ३५२, ३५१ (२) सह भारतीय शस्त्र अधिनियम ४ (२५) आणि क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट ३ व ७ नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या अशा गुन्हेगारी वृत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची ही धडक कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!