news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड फरार ‘मुंगळे’ अखेर पोलिसांच्या हाती: पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची थरारक कारवाई!

फरार ‘मुंगळे’ अखेर पोलिसांच्या हाती: पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची थरारक कारवाई!

कळाचीवाडीतून ताब्यात, गावठी पिस्तूल आणि काडतुसांसह नवीन गुन्हा दाखल; वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी मोहीम. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट ३ ची धडाकेबाज कामगिरी!

१ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे हस्तगत; म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांचे मोठे यश!

पिंपरी, दि. १८ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने एका वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पाहिजे असलेल्या आरोपीला शिताफीने अटक केली आहे. दि. १७ जून २०२५ रोजी केलेल्या या कारवाईत आरोपीकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत, ज्यामुळे म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला मोठे यश मिळाले आहे.


फरार आरोपी शुभम मुंगळे जेरबंद

गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस हवालदार आढारी (७५५), पोलीस हवालदार सोनवणे (८९३), पोलीस शिपाई मेरगळ (२८७७), पोलीस शिपाई जैनक (२२९६), पोलीस शिपाई बाळसराफ (२३९९) हे अभिलेखावरील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना, त्यांना मिळालेल्या बातमीनुसार ही कारवाई करण्यात आली.

म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं. ६५६/२०२४ भा.दं.वि. कलम ३२४ या गुन्ह्यामध्ये गेले एक वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी शुभम सोमेश्वर मुंगळे (वय २० वर्षे, रा. कळाचीवाडी ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. तडखेल ता. देगलूर जि. नांदेड) याला निघोजे येथून ताब्यात घेण्यात आले.


अवैध शस्त्रसाठा जप्त, गुन्हा दाखल

ताब्यात घेतलेल्या शुभम मुंगळेच्या अंगझडतीमध्ये ०१ गावठी पिस्तुल आणि ०२ जिवंत काडतुसे मिळून आली. या अवैध शस्त्रामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सदर आरोपीविरुद्ध पोलीस शिपाई रामदास वशवंत मेरगळ (२८७७) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं. ३८४/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह कलम १३५ प्रमाणे नवीन गुन्हा दाखल केला आहे.


वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आबाड, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस हवालदार आढारी (७५५), पोलीस हवालदार सोनवणे (८९३), पोलीस हवालदार मोरे (९१९), पोलीस शिपाई मेरगळ (२८७७), पोलीस शिपाई जैनक (२२९६), पोलीस शिपाई बाळसराफ (२३९९), पोलीस शिपाई काळे (२८८३), आणि पोलीस हवालदार नागेश माळी यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

(संदिप डोईफोडे) पोलीस उपआयुक्त (गुन्हे) पिंपरी चिंचवड


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!