news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या ‘विचार प्रबोधन पर्वा’ची लगबग!

पिंपरी-चिंचवडमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या ‘विचार प्रबोधन पर्वा’ची लगबग!

महापालिकेचे नियोजन अंतिम टप्प्यात; सोहळ्याच्या तयारीसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून स्थळ पाहणी आणि आढावा बैठक. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती ‘विचार प्रबोधन पर्वा’च्या तयारीला सुरुवात!

पिंपरी-चिंचवड महापालिकेची जय्यत तयारी, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांचेकडून कार्यक्रमस्थळाची पाहणी; सोमवारी आढावा बैठक!

पिंपरी, दि. ११ जुलै २०२५: साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाच्या तयारीला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सुरुवात झाली आहे. येत्या सोमवारी, दि. १४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, त्या पार्श्वभूमीवर आज फ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.

कार्यक्रमस्थळाची सविस्तर पाहणी:

दरवर्षी निगडी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या तयारीचा सविस्तर आढावा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी घेतला. पाहणीदरम्यान मेट्रो व्यवस्थापनाचे व्यवस्थापक धनंजय कृष्णन, येतेंद्र कुलकर्णी, युवराज गावंडे, महापालिका स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता विजय वाईकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ, माजी अध्यक्ष नितीन घोलप, संजय ससाणे, नाना कसबे, अरुण जोगदंड, सुनील भिसे, दत्तात्रय चव्हाण, बाळासाहेब खंदारे, महापालिका उप अभियंता अभय कुलकर्णी, जयकुमार गुजर, शामसुंदर बनसोडे, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता अभिजीत गनबोटे, भाऊसाहेब गवंडी, तसेच महापालिका संबंधित अधिकारी व मेट्रो प्रतिनिधी उपस्थित होते.

क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी कार्यक्रमपूर्व आणि कार्यक्रमादरम्यान आवश्यक असलेल्या स्थापत्य, स्वच्छता, विद्युत सुविधा, मंच रचना, वाहनतळ व्यवस्था, महिला व वयोवृद्ध नागरिकांसाठी सुलभ मार्ग आदी बाबींविषयी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचनाही दिल्या.

या पाहणी दरम्यान कार्यक्रम स्थळी उभारण्यात येणाऱ्या स्टेज, मंडप, प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था, व्यासपीठाचे डिझाईन, चित्रफिती किंवा पोस्टर्स, कार्यक्रमस्थळी परिसराची स्वच्छता व डासमुक्ती याकडे विशेष लक्ष, कार्यक्रमापूर्वी आणि दररोज कार्यक्रमानंतर परिसराची स्वच्छता, वैद्यकीय सुविधा, अग्निशमन, पाणीपुरवठा आणि आपत्कालीन सुविधा यांची तयारी ठेवण्यात यावी अशा सूचना क्षेत्रीय अधिकारी पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

विचार प्रबोधन पर्वातील उपक्रम:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयोजित या प्रबोधन पर्वात विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये यांचाही सहभाग असतो. प्रबोधनात्मक कार्यक्रमांसोबतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित परिसंवाद, विचारवंत वक्त्यांचे व्याख्यान, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, चित्रप्रदर्शन यांसारखे उपक्रमही राबविण्यात येतात.

सोमवारी महत्त्वाच्या आढावा बैठकीचे आयोजन:

या पार्श्वभूमीवर, येत्या सोमवार दि. १४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता महानगरपालिकेच्या दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाशी संबंधित महापालिका अधिकारी, पोलीस व मेट्रो प्रशासन, पी.एम.पी.एम.एल. अधिकारी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती पदाधिकारी तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना प्रतिनिधी यांचेसमवेत आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. शहरातील सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!