news
Home पिंपरी चिंचवड मुलींच्या हाती संविधान द्या! – महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर

मुलींच्या हाती संविधान द्या! – महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर

मंत्री जयकुमार गोरे यांच्या सत्कार सोहळ्यात महत्त्वाचा विचार; फुले दांपत्यास 'भारतरत्न' हा हक्कच असल्याचे जयकुमार गोरे यांचे प्रतिपादन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

फुले दांपत्यास भारतरत्न मिळणे हा आपला अधिकार आणि हक्कच!

ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांचा पिंपरी-चिंचवड येथे नागरी सत्कार

पिंपरी (प्रतिनिधी): महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले या दांपत्यास ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी जोर धरते, पण हा पुरस्कार मागण्यापेक्षा तो आपला अधिकार आणि हक्क आहे, असे परखड प्रतिपादन ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. चिंचवड येथील महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

चिंचवडमधील प्रा. मोरे प्रेक्षागृहात श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध पुरस्कार वितरण आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला. या सोहळ्यात मंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला, तसेच अनेक गुणवंत व्यक्ती आणि विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

पुरस्कार वितरण आणि गुणवंतांचा सन्मान

या कार्यक्रमात संत सावता महाराज यांच्या स्मृतींना वंदन करत, विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावर्षीचा ‘संत सावता भूषण पुरस्कार’ संतोष लोंढे यांना, तर ‘संत सावता कृषीरत्न पुरस्कार’ हभप मुरलीधर भुजबळ आणि दिलीप विधाटे या प्रगतिशील शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे, ‘संत सावता उद्योग रत्न पुरस्कार’ संजय जगताप यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमात प्रशासकीय सेवेत नुकत्याच रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये सहायक आयुक्त मनोज लोणकर आणि सहायक पोलीस निरीक्षक राहुल नामदे यांचा समावेश होता. तसेच, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेले आकाश गोरे, रोहन पिंगळे, विशाल पांढरे आणि गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त साखरचंद लोखंडे, शिवराज शिंदे यांच्यासह ७२ विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, माजी नगरसेवक वसंत लोंढे, माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संत सावता महाराज यांचे वंशज सावता महाराज वसेकर, माजी महापौर अपर्णा डोके, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, प्रशांत डोके, सीए सुहास गार्डी आणि मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

“माझ्या मंत्रिपदावरही घाला घालण्याचा प्रयत्न झाला” – मंत्री जयकुमार गोरे

आपल्या भाषणात मंत्री गोरे यांनी त्यांच्या राजकीय प्रवासातील काही संघर्षपूर्ण आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “मी माण खटाव तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी २००९ पासून निवडणुकीच्या मैदानात लढत आहे. एका सामान्य घरातील मुलगा प्रस्थापितांच्या विरोधात उभा राहून विकासाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारतो, हे त्यांना पचत नाही. त्यामुळे मला संपवण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न केले जातात.” एका मोठ्या नेत्याचे नाव न घेता त्यांनी असाही आरोप केला की, मंत्री झाल्यावर देखील त्यांचे मंत्रिपद घालवण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावल्या होत्या आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात.

सासरी जातांना मुलीच्या हाती संविधान द्या!

कार्यक्रमात बोलताना महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी अत्यंत महत्त्वाचा विचार मांडला. त्या म्हणाल्या, “मुली सासरी जाताना त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान द्यावे. कारण मुलींनी संविधान वाचावे यासाठीच सावित्रीबाईंनी अंगावर शेण आणि मातीचे गोळे सहन केले. त्यांना वाटले होते की पुढे जाऊन महिला संविधान वाचतील. मात्र आज ज्या सत्यवानाची सावित्री कोणी पाहिली नाही, त्या सावित्रीची वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण त्याचवेळी ज्योतिबाच्या सावित्रीच्या विचारांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.” ही मानसिकता बदलण्याची आज समाजाला नितांत गरज आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे प्रशांत डोके, सुर्यकांत ताम्हाणे, अनिल साळुंके, विश्वास राऊत, महादेव भुजबळ, निलेश डोके, नितीन ताजणे, वैजनाथ माळी, विलास शेंडे, नरहरी शेवते, किशोर माळी, निखिल यादव, अजित भोसले, केशव ताजणे, शिवम् बर्के, पोपट ताजणे, प्रदीप दर्शले, अमर ताजणे, अनिता ताठे, उर्मिला भुजबळ, आशा माळी, वृषाली ताजणे, कुंदा यादव, स्मिता माळी, शारदा राऊत, पूजा साळुंके, हर्षद भुजबळ, श्रीहरी हरळे, प्रकाश गोरे, नवनाथ कुदळे, कौशल माळी, परेश ताम्हाणे, रमेश गायकवाड, अशोक टिळेकर यांनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष हनुमंत माळी यांनी केले, सूत्रसंचालन पौर्णिमा कोल्हे आणि हभप महादेव भुजबळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन विश्वास राऊत यांनी केले.

© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!