news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home मुख्यपृष्ठ विकासकामांचा पाया: खासदार प्रणिती शिंदे यांच्यामुळे मोहोळ तालुक्यात नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य

विकासकामांचा पाया: खासदार प्रणिती शिंदे यांच्यामुळे मोहोळ तालुक्यात नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य

स्मशानभूमीचे लोकार्पण करून घेतली गावकऱ्यांची समस्या जाणून; खवणी व सारोळे गावांतीलही प्रश्न ऐकून घेतले. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

गावकऱ्यांच्या दीर्घकाळच्या मागणीची पूर्तता: खासदार प्रणिती शिंदे यांच्या स्वखर्चातून उभारलेल्या स्मशानभूमीचे लोकार्पण

 

 

खासदार प्रणिती शिंदे यांनी येवती, खवणी व सारोळे गावांचा दौरा करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.

 

सोलापूर प्रतिनिधी पंडित गवळी, १३ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील येवती, खवणी व सारोळे गावांचा दौरा करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या येवती गावातील स्मशानभूमीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडले. गावकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रमुख मागणी पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या कामामुळे गावाला एक महत्त्वाची आणि मूलभूत सुविधा उपलब्ध झाली आहे.

कार्यक्रमास उपस्थित ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे एकमुखाने आभार मानले. ग्रामस्थांनी यावेळी सांगितले की, “स्मशानभूमीच्या अभावामुळे आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. परंतु आजपासून गावाला मोठा दिलासा मिळाला असून, खासदार शिंदे यांनी दाखविलेल्या पुढाकारामुळे गावाची महत्त्वाची समस्या सुटली आहे.”


खासदार प्रणिती शिंदे यांचा गावकऱ्यांशी संवाद

 

खासदार प्रणिती शिंदे ग्रामस्थांशी संवाद साधताना म्हणाल्या, “मोहोळसह सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाची समस्या माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. स्मशानभूमीत लोक दुःखाच्या प्रसंगी जातात, त्यामुळे स्वच्छ, व्यवस्थित आणि सन्मानजनक जागा असणे अत्यंत आवश्यक आहे. येवती गावातील स्मशानभूमी ही केवळ एक सुविधा नसून, गावकऱ्यांच्या सन्मानाशी जोडलेला प्रश्न होता. गावकऱ्यांची दीर्घकाळची मागणी पूर्ण झाल्याचे समाधान मला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मी केवळ विकासकामे करणेच नव्हे, तर नागरिकांच्या भावनांना स्पर्श करणाऱ्या योजनाही प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे.” भविष्यातही येवती गावाला आवश्यक ते सर्व सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी खवणी व सारोळे गावांचा दौरा करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकरी, महिला, युवक यांच्याशी संवाद साधून गावातील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांवर सातत्याने काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे सांगितले आणि आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनामार्फत राबविण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाला मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश पवार, येवतीचे सरपंच भाग्यश्री खुर्द, माजी सरपंच विक्रमसिंह पाटील, सारोळेचे सरपंच शाहीर सलगर, खवणीचे सरपंच शीतल यमगर, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, ज्येष्ठ नेते तात्या गोडसे, कुमार गोडसे, आनंद पाटील, शामराव काळे पाटील, कामराज चव्हाण, तेजस बोबडे, सतीश खिलारे, तुकाराम भोसले, बंडू खुर्द, मौला बागवान, अतुल भोसले, गणेश खुर्द, अनिल शिंगाडे, अजितसिंह भोसले, पूजाताई खिलारे, बाबा गाडे, सुनील खुर्द, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, महिला कार्यकर्त्या, तरुण कार्यकर्ते तसेच शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!