शंकरराव मासुळकर नेत्र रुग्णालय हे शहराचे ‘नेत्र’: जागृत नागरिक महासंघाचे गौरवोद्गार
रुग्णालयातील स्वच्छता आणि मोफत सेवेमुळे नागरिक महासंघ प्रभावित
पिंपरी, प्रतिनिधी बालाजी नवले १७ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
सरकारी रुग्णालयांबद्दल अनेकदा नकारात्मक सूर ऐकायला मिळतो, पण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शंकरराव मासुळकर नेत्र रुग्णालयाने हा समज पूर्णपणे खोटा ठरवला आहे. येथील उत्कृष्ट सेवा, स्वच्छता आणि कार्यक्षमतेमुळे जागृत नागरिक महासंघाने या रुग्णालयाला ‘शहराचे नेत्र’ असे गौरवले आहे. महासंघाच्या शिष्टमंडळाने या रुग्णालयाला भेट देऊन तेथील सेवेची प्रत्यक्ष पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले.

स्वच्छता आणि मोफत सेवेने जिंकली मने
महासंघाच्या सदस्यांनी रुग्णालयातील प्रत्येक भागाची बारकाईने पाहणी केली. त्यांना विशेषतः स्वच्छतागृहांची उत्तम देखभाल आणि संपूर्ण परिसरातील टापटीपपणा पाहून आश्चर्य वाटले. याहून अधिक प्रभावी बाब म्हणजे रुग्णालयातील सेवा. रुग्णालयाच्या मुख्य अधिकारी डॉ. रूपाली महेशगौरी यांनी सांगितले की, येथे दररोज २५० हून अधिक रुग्णांची डोळ्यांची तपासणी होते, तर २५ हून अधिक शस्त्रक्रियांसाठी तयारी केली जाते. ही सेवा जवळपास पूर्णपणे मोफत असून, केवळ केस पेपर आणि चष्म्यासाठी अल्प शुल्क आकारले जाते. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधल्यावर त्यांनीही सेवेबद्दल पूर्ण समाधान व्यक्त केले.
हे हॉस्पिटल म्हणजे खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवडचे नेत्र आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आणि डॉ. दादेवार यांचे महासंघातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त केले पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांनी सदर रुग्णालयाला आवश्यक असणाऱ्या इतर यंत्रसामग्री व इतर बाबी व मनुष्यबळ अजून जास्त प्रमाणात पुरवले तर ही सेवा अजूनही उत्कृष्ट होईल अशी महासंघाला खात्री वाटते आणि डॉक्टर लक्ष्मण गोफणे व अभय चंद्र दादेवार महासंघाच्या सूचनेल डॉक्टर लक्ष्मण गोफणे डॉक्टर दादेवार हे हॉस्पिटलच्या मागणीला नक्कीच मार्गदर्शन करतील अतिशय सकारात्मक घेतील व येणाऱ्या पेशंटला सुलभ सुविधा घेता येतील

‘आई’ची उपमा आणि सेवेचा आदर्श
महासंघाने रुग्णालयाच्या यशस्वी कामकाजाबद्दल डॉ. रूपाली महेशगौरी, इतर कर्मचारी आणि बीव्हीजी कर्मचाऱ्यांचे आभार मानले. डॉ. महेशगौरी यांनीही महासंघाच्या कार्याचे कौतुक करताना त्यांना ‘आई’ची उपमा दिली. जशी आई आपल्या मुलांना आदर्श नागरिक बनवते, त्याचप्रमाणे महासंघ प्रशासनाला उत्कृष्ट सेवा देण्यासाठी काम करत आहे, असे त्या म्हणाल्या. महासंघाने रुग्णालयाची सेवा अधिक उत्कृष्ट होण्यासाठी अतिरिक्त यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणीही केली.
रुग्णालयामध्ये माहिती अधिकार कायदा कलम ४ ची पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही तरीही डॉ रूपाली महेशगौरी यांनी माहिती अधिकार कलम ४ ची संपूर्ण कार्यवाही कमीत कमी कालावधीमध्ये पूर्ण केली जाईल अशी महासंघाला खात्री दिली पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या नेत्र रुग्णसेवे बद्दल जागृत नागरिक महासंघाने डॉ. रूपाली महेशगौरी डॉक्टर लक्ष्मण गोफणे सरआणि डॉ. दादेवार सर यांचे मनःपूर्वक आभार मानले त्यावेळी जागरूक नागरिक महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव उपाध्यक्ष राजेश विश्वकर्मा पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे सचिव राजू डॉगीवाल उपस्थित होते
शंकरराव मासुळकर नेत्र रुग्णालय हे केवळ उपचार केंद्र नाही, तर नागरिकांसाठी एक विश्वास आणि आशेचे केंद्र बनले आहे. त्यांच्या या कामामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या आरोग्य सेवेचा मान वाढला आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
