अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे – नारायण कुचे
पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनुसूचित जाती कल्याण समितीची बैठक; कल्याणकारी योजनांचा घेतला आढावा
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे १९ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचे प्रमुख नारायण कुचे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने आखलेल्या योजनांची योग्य अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
पुणे जिल्हा दौऱ्यावर असलेल्या या समितीची महापालिका मुख्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत महापालिकेत अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती, पदोन्नती, आरक्षण आणि अनुशेषाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, अनुसूचित जातींसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचाही आढावा घेण्यात आला.
यावेळी नारायण कुचे म्हणाले, “अनुसूचित जातींसाठी असलेल्या निधीचा वापर केवळ त्याच योजनांसाठी केला जावा.” तसेच, त्यांनी प्रशासकीय यंत्रणांनी सर्व योजना आणि लाभ पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचतील याची खात्री करण्याचे निर्देश दिले.
सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष
या बैठकीत विशेषतः सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर भर देण्यात आला. कुचे म्हणाले, “सफाई कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेताना माणुसकीच्या दृष्टीने विचार करावा.” या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करून त्यांचे हक्क त्यांना मिळावेत, तसेच त्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, असे निर्देशही कुचे यांनी प्रशासनाला दिले.
या बैठकीला आमदार अमित गोरखे, भीमराव केराम, तानाजी मुटकुळे, शाम खोंडे , सचिन पाटील, गजानन लवटे, संजय मेश्राम, डॉ. प्रज्ञा सातव, जगन्नाथ अभ्यंकर यांच्यासह विधानमंडळ सचिवालयाचे सहसचिव सुभाष नलावडे, अवर सचिव सीमा तांबे, कक्ष अधिकारी राहुल लिंगरवार, समिती प्रमुख यांचे स्वीय सहाय्यक रणजित गमरे, सहाय्यक कक्ष अधिकारी संदीप माने, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता अनिल भालसाखळे, अजय सुर्यवंशी, देवन्ना गट्टुवार, माणिक चव्हाण, उपायुक्त सचिन पवार, सिताराम बहुरे, राजेश आगळे, संदीप खोत, ममता शिंदे, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, किरणकुमार मोरे, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त कीर्ती नलावडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, पुणे जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्यासह कामगार नेते गणेश भोसले, तुकाराम गायकवाड, संजय जगदाळे, अविनाश ढमाले, परशुराम कदम, अविनाश इंगवले ,यांच्यासह महापालिका आयुक्त शेखर सिंह तसेच पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्हा प्रशासनातील समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद आदींचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


