news
Home मुख्यपृष्ठ एका जीपच्या कटने संपले आयुष्य: एका RTI कार्यकर्त्याच्या हत्येमागील भयावह सत्य

एका जीपच्या कटने संपले आयुष्य: एका RTI कार्यकर्त्याच्या हत्येमागील भयावह सत्य

भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्त्याच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण झाले; 'लातूरमधील रोडरेजमध्ये अनमोल केवटे यांचा खून, सोबतीच्या महिलेवरही हल्ला. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

माहिती अधिकार कार्यकर्ता अनमोल केवटे यांचा खून

 

 

लातूर येथे जीपचा कट लागल्याच्या वादातून भोसकून हत्या; सहकारी महिला गंभीर जखमी

 

सोलापूर, प्रतिनिधी :- पंडित गवळी  २१ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

लातूर येथील खाडगाव रोडवर जीप गाडीचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून सोलापूरमधील माहिती अधिकार कार्यकर्ता अनमोल अनिल केवटे (वय ३४) यांची धारदार हत्याराने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत त्यांच्यासोबत असलेल्या महिला सहकारी सोनाली भोसले-सुपेकर (वय ३२) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


भयंकर घटना आणि पार्श्वभूमी

बुधवारी मध्यरात्री १२:४५ वाजता हा थरार घडला. अनमोल केवटे आणि सोनाली भोसले हे एका बैठकीसाठी लातूरला गेले होते. बैठक संपवून ते रात्री सोलापूरच्या दिशेने परत येत असताना त्यांच्या कारला एका क्रूझर जीपने कट मारला. यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि क्रूझर चालकाने अनमोल केवटे यांचा गळा चिरून खून केला. सोनाली भोसले यांच्या पाठीत आणि पोटात भोसकल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.


प्रशासनात भीती, तर काहींना दिलासा

अनमोल केवटे हे भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे माजी कार्यकर्ता होते. त्यांच्या नावाची मंद्रूप परिसरात मोठी दहशत होती, असे म्हटले जाते. त्यांनी शिक्षण संस्था, शिक्षक, शासकीय कर्मचारी आणि पोलिसांविरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या आणि त्यांचा पाठपुरावा करत असत. त्यांच्या सततच्या तक्रारींमुळे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच, अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडल्याचेही वृत्त आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!