news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड सुरक्षित खाद्यसंस्कृतीकडे एक पाऊल: पिंपरीतील विक्रेते आणि ग्राहक एकत्र

सुरक्षित खाद्यसंस्कृतीकडे एक पाऊल: पिंपरीतील विक्रेते आणि ग्राहक एकत्र

विक्रेत्यांना आधुनिक प्रशिक्षण आणि सुरक्षा साधने; नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

‘स्वच्छ अन्न-सुरक्षित ग्राहक’: विक्रेत्यांच्या प्रशिक्षणास फेरीवाल्यांचा विक्रमी प्रतिसाद

 


 

एफएसएसएआय, एफडीए व फेरीवाला महासंघातर्फे आयोजन; ७१७ विक्रेत्यांनी घेतला लाभ

 

पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, २५ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

भारतीय अन्नसुरक्षा मानके प्राधिकरण (FSSAI), अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अन्नसुरक्षा प्रशिक्षण शिबिराला शहरातील विक्रेत्यांनी विक्रमी प्रतिसाद दिला. प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात तब्बल ७१७ पथारी, हातगाडी आणि टपरीधारकांनी सहभाग घेतला.


 

प्रशिक्षणासोबत मोफत सुरक्षा साधने

 

यावेळी उपस्थित विक्रेत्यांना अन्नपदार्थ तयार करताना घ्यायची काळजी, वापरण्यात येणाऱ्या तेलाची सुरक्षितता, तसेच कच्च्या मालाच्या योग्य वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने हे प्रशिक्षण देण्यात आल्याने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले. यासोबतच, पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छ अन्न व ग्राहक सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. प्रशिक्षणार्थी विक्रेत्यांना ॲप्रन, कॅप व अन्नपदार्थ बनवतानाची सुरक्षा साधने मोफत वाटप करण्यात आली.

या कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासनाच्या केंद्रीय संचालक ज्योती हरणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पथविक्रेता समितीचे सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, किसन भोसले, अलका रोकडे, महासंघाचे संघटक अनिल बारवकर,कार्याध्यक्षरफान चौधरी, उपाध्यक्ष राजेश माने, बालाजी लोखंडे,सुनील भोसले, नंदू आहेर, सूरज देशमाने,सचिन नागने,लाला राठोड, माधुरी जलमूलवार,रुक्मिणी जाधव,स्वाती पालके,लक्ष्मी गायकवाड,मुमताज शेख,जरीता वाटोरे, नंदा तेलगोटे,शारदा राक्षे, राजू कुटकर, वहिदा शेख, शामशुद्दीन शेख,सुग्रीव नरवटे, दादा भानवसे,सुरेश जाधव, सलीम शेख, राजू पठाण, अंबादास जावळे, फरीद शेख, सहदेव होनमने, रज्जाक शेख यांचेसह महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.


 

१० हजार विक्रेत्यांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट

 

कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी या अभियानाविषयी माहिती दिली. “रस्त्यावरील विक्रेत्यांचे जीवनमान सुधारावे आणि त्यांना आधुनिक स्पर्धेत टिकवता यावे, यासाठी आम्ही गेल्या १० वर्षांपासून ‘संत गाडगेबाबा स्वच्छ फेरीवाला अभियान’ यशस्वीपणे राबवत आहोत. याअंतर्गत आतापर्यंत ४ हजार ३१७ विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले आहे. येत्या काळात १० हजार विक्रेत्यांना प्रशिक्षित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” असे ते म्हणाले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी, सांगवी, चिंचवड, चिखली, मोशी, देहूरोड, निगडी, रावेत यासह अनेक परिसरातील विक्रेत्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!