news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home अमरावती अमरावती विभागाची निर्यात २ हजार कोटींवर

अमरावती विभागाची निर्यात २ हजार कोटींवर

टास्क फोर्स समितीची महत्त्वपूर्ण बैठक; वस्त्रोद्योग, लॉजिस्टिक्सला प्रोत्साहन देण्याची सूचना. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ला संधी समजा; उद्योजकांनी एकत्रितरित्या निर्यात वाढवावी – अपूर्व चंद्रा

 


 

टास्क फोर्स समितीची अमरावतीत बैठक; वस्त्रोद्योग, लॉजिस्टिक्सला प्रोत्साहन देण्याची सूचना

 

अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, २५ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमेरिकेने आयात मालावर लावलेल्या टॅरिफमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना न घाबरता, उद्योजकांनी या आपत्तीला संधी समजावे. आपल्या उत्पादित मालासाठी पर्यायी बाजारपेठा शोधाव्यात आणि एकत्रितपणे राज्याची आयात-निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष अपूर्व चंद्रा यांनी केले. जागतिक आयात-निर्यात धोरणांवर उपाययोजना करण्यासाठी अमरावती येथे आयोजित निर्यातदार उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते.


निर्यात धोरणासाठी मागण्या नोंदवा

 

राज्य शासनाने उपाययोजना आखण्यासाठी सेवा निवृत्त सनदी अधिकारी अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही टास्क फोर्स समिती गठीत केली आहे. श्री. चंद्रा म्हणाले की, अमेरिकेच्या टॅरिफमुळे निर्यातदारांच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी समिती राज्यातील सर्व उद्योजकांशी चर्चा करून एकत्रित अहवाल राज्य शासनाला सादर करेल. राज्याच्या निर्यात धोरणासंदर्भात काही सूचना किंवा बदल अपेक्षित असल्यास, उद्योजकांनी ते तात्काळ समितीकडे नोंदवावेत, असे आवाहन त्यांनी केले.


विभाग २ हजार कोटींच्या निर्यातीत अग्रेसर

 

यावेळी उद्योग सहसंचालक निलेश निकम यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये अमरावती विभागातून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीने सुमारे २ हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. कृषी, वस्त्रोद्योग आणि रसायनांच्या निर्यातीमुळे ही वाढ झाली असून, यात बुलढाणा (८७४ कोटी) आणि अमरावती (४६७ कोटी) जिल्ह्यांचा मोठा वाटा आहे.

विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी सांगितले की, नवीन उद्योगांसोबतच सध्याच्या उद्योगांच्या विकासासाठी शासन सकारात्मक आहे. अमरावती विभागात टेक्सटाईल हब निर्मितीसाठी पोषक वातावरण आणि खूप मोठी संधी (स्कोप) आहे. त्या दिशेने उद्योजकांनी पुढाकार घ्यावा.

श्री. चंद्रा यांनी, ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीतून उद्योजकांना सवलतीत वीज, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग आणि एमआयडीसी विभागाने नियोजनबद्ध प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना दिल्या.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!