news
Home पिंपरी चिंचवड सोलापूरला पिंपरी-चिंचवडचा मदतीचा हात! ‘शंकरशेठ कुऱ्हाडे स्पोर्ट फाउंडेशन’ कडून पूरग्रस्त लोंढेवाडीतील कुटुंबांना धान्य पुरवठा

सोलापूरला पिंपरी-चिंचवडचा मदतीचा हात! ‘शंकरशेठ कुऱ्हाडे स्पोर्ट फाउंडेशन’ कडून पूरग्रस्त लोंढेवाडीतील कुटुंबांना धान्य पुरवठा

संस्थापक अध्यक्ष शंकर कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक उपक्रम; नुकसान मोठे असले तरी मदतकार्य अखंड सुरू ठेवणार असल्याचे आश्वासन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

माणुसकीची मदत! अतिवृष्टीग्रस्तांसाठी ‘शंकरशेठ कुऱ्हाडे स्पोर्ट फाउंडेशन’कडून सोलापूर जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

 


 

मोहोळ येथील लोंढेवाडीत सरकारची मदत पोहोचण्यापूर्वीच पिंपरी-चिंचवडच्या फाउंडेशनचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम.

 

पिंपरी प्रतिनिधी, बालाजी नवले, सप्टेंबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:

गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा आणि पूरस्थितीचा मोठा तडाखा बसला आहे, ज्यामुळे अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्त भागात प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असले तरी, मोहोळमधील अनेक नागरिकांपर्यंत सरकारी मदत पोहोचलेली नाही. ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन, पिंपरी-चिंचवड शहरातील इंदिरानगर येथील शंकरशेठ कुऱ्हाडे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने मोहोळमधील लोंढेवाडी येथील पीडित कुटुंबांसाठी तातडीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासन आणि सरकारची मदत पोहोचण्यापूर्वीच, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शंकर कुऱ्हाडे यांनी ‘एक हात मदतीचा’ म्हणून हा सामाजिक उपक्रम हाती घेतला.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

 

या उपक्रमांतर्गत पूरग्रस्त नागरिकांसाठी धान्य, तांदूळ, डाळी, साखर यासह दैनंदिन वापराच्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.

फाउंडेशनच्या वतीने यावेळी शंकर कुऱ्हाडे, दिनेश कुऱ्हाडे, सागर ओरसे, पिंटू जाधव, बाळू शिंदे यांसह अन्य सदस्य उपस्थित होते.

संस्थापक अध्यक्ष शंकर कुऱ्हाडे यांनी यावेळी सांगितले की, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान मोठे आहे आणि फाउंडेशनच्या वतीने हे मदतकार्य अखंडपणे सुरू राहील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्या नागरिकांना पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांकडून मिळालेला हा मदतीचा हात दिलासा देणारा ठरला आहे.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!