क्रीडा क्षेत्राला बळ! खेळाडू दत्तक योजनेतील
विद्यार्थ्यांना
लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांना प्रशासक शेखर सिंह यांची मान्यता; व्हिएतनाममधील रौप्य पदक विजेत्या प्रगती गायकवाडला शिष्यवृत्ती.
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे दि. ३० सप्टेंबर २०२५ , मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड शहरात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित खेळाडूंना आर्थिक पाठबळ देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘खेळाडू दत्तक योजने’ अंतर्गत पात्र विद्यार्थी खेळाडूंना
लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ देण्यास महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत आज (मंगळवार) मंजुरी देण्यात आली.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी आयुक्तांनी विविध विषयांना मान्यता दिली, तसेच शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा विभागनिहाय आढावा घेतला.

खेळाडूंना प्रोत्साहन व आयुक्तांचा विश्वास
पिंपरी-चिंचवड महापालिका शहरात नवीन खेळाडू घडावेत आणि त्यांनी क्रीडा क्षेत्रात नाव कमवावे, यासाठी ही योजना राबवते. याच अनुषंगाने, २०२२-२३ मध्ये प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र विद्यार्थी खेळाडूंना २०२५-२६ ते २०२६-२७ या आर्थिक वर्षांमध्ये लाभ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
याबद्दल बोलताना आयुक्त शेखर सिंह यांनी विश्वास व्यक्त केला की, “हे खेळाडू भविष्यात नक्कीच पिंपरी-चिंचवड शहराचे नाव उंचावतील.”

बैठकीत मंजूर झालेले महत्त्वाचे निर्णय
आजच्या स्थायी समिती बैठकीत खेळाडूंच्या प्रोत्साहनपर निर्णयांसोबतच शहर विकासाच्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी मिळाली, त्यापैकी प्रमुख खालीलप्रमाणे:
क्रीडा व सामाजिक:
- शिष्यवृत्ती: व्हिएतनाम येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केलेल्या कु. प्रगती विनोद गायकवाड या खेळाडूस शिष्यवृत्ती अदा करणे.
- क्रीडा स्पर्धा: शासकीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा
–
आयोजित करण्यास मान्यता.
- सामाजिक उपक्रम: ‘घरोघरी तिरंगा
‘ उपक्रमांतर्गत आवश्यक राष्ट्रध्वज खरेदी करणे.
- आरोग्य सेवा: कर्णबधिर मुलांच्या स्पीच थेरपीद्वारे सुविधा विभागास मुदतवाढ देणे.
विकासकामे आणि पायाभूत सुविधा:
- रस्ते विकास: प्रभाग
किवळे भागातील कातळे वस्ती येथील
मी. रुंदीचा डी. पी. रस्ता विकसित करण्यासाठी सल्लागार नेमणे. तसेच, शिंदे वस्ती पाईपलाईन रस्ता विकसित करण्याच्या प्रकल्पाकरिता सल्लागार नेमणे.
- डांबरीकरण: प्रभाग
निगडी गावठाण येथील स्पाईन रोड परिसरातील विविध ठिकाणी रस्त्याचे हॉट मिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे.
- दुरुस्ती व देखभाल: ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग क्र.
मधील पाणी पुरवठ्याच्या कामांमुळे झालेले चर व खड्डे हॉट मिक्स पद्धतीने दुरुस्त करणे. तसेच, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग
मधील सार्वजनिक शौचालयांचे व मुतऱ्यांची यांत्रिक पद्धतीने दैनंदिन साफसफाई व देखभाल दुरुस्ती कामास मुदतवाढ देणे.
- ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प: मोशी येथील
मेगावॅट वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचे मनपाच्या विविध आस्थापनांमध्ये समायोजन करण्यासाठी म. रा. वि. वि. कं. लि. यांस विजपर्यवेक्षण शुल्क अदा करणे.
इतर:
- झोपडपट्टी पुनर्वसन: भूमकर चौक, वाकड येथील ताथवडे हद्दीपर्यंत
मी. रस्त्याने बाधित होणारे
सीट्सचे सुलभ शौचालय निष्कासित (Dismentle) करण्यास मान्यता देणे.
- गाळे दुरुस्ती: आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील प्राधिकरणाकडून मनपाच्या ताब्यात आलेल्या
गाळे व टॉयलेट ब्लॉक्सची दुरुस्ती व इतर अनुषंगीक कामे करण्यासाठी खर्चास मान्यता.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सह आयुक्त मनोज लोणकर, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
