आंतरराष्ट्रीय क्षितिज खुले! पीसीयू-कोस्मे शैक्षणिक करारामुळे विद्यार्थ्यांना कोरियन प्रगती अभ्यासण्याची संधी
पिंपरी चिंचवड विद्यापीठ (PCU) पश्चिम महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ; विद्यार्थी आदानप्रदान, कोरियन भाषा शिक्षण आणि रोजगार संधी उपलब्ध होणार.
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले दि. सप्टेंबर
(मॅक्स मंथन डेली न्यूज):
दक्षिण कोरियाने शैक्षणिक, तांत्रिक आणि औद्योगिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा थेट लाभ आता पिंपरी-चिंचवड विद्यापीठाच्या (PCU) विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड विद्यापीठ (PCU) आणि दक्षिण कोरियाच्या कोरियन एसएमई (KoSME) यांच्यामध्ये सोमवारी ( सप्टेंबर
) पीसीयू, साते मावळ येथे महत्त्वपूर्ण शैक्षणिक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या ऐतिहासिक करारामुळे PCU हे कोस्मेसोबत सहकार्य करणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. या कार्यक्रमात ‘कोरिया फॅसिलिटेशन सेंटर’ आणि ‘कोस्मे ट्रेनिंग प्रोग्राम’ चाही शुभारंभ करण्यात आला.
कोरियन वाणिज्य दूतांकडून पाठिंबा
दक्षिण कोरियाचे वाणिज्य दूत यू डोंगवान यांनी या भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “कोस्मे – पीसीयू यांच्यातील करारामुळे विद्यार्थ्यांना कोरियन ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे. विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रम, कोरियन भाषा शिक्षण सुरू करण्यासाठी सहाय्य आणि दक्षिण कोरियातील विद्यापीठांशी थेट संवाद साधण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल.”

आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण व रोजगार संधी
पीसीईटीचे विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील म्हणाले, “महाराष्ट्राला पर्यंत एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे ध्येय आहे. तरुणांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, संशोधन आणि औद्योगिक संधी मिळणार असल्याने हा करार ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरक ठरेल.” कोस्मेसोबत हा ऐतिहासिक करार करणे ही पीसीयूसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
कोस्मेचे चेअरमन जे क्युंग ली यांनी या सहकार्यामुळे विद्यार्थी व तरुणांना कोरियन एसएमई सोबत प्रशिक्षण व रोजगार संधी उपलब्ध होतील, तसेच भारत-कोरियातील स्टार्टअप्सना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य मिळेल, असे स्पष्ट केले.
पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, कोस्मेच्या जागतिक प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यामुळे कोरियन कंपन्यांमध्ये इंटर्नशिप, प्लेसमेंट व उच्च शिक्षणाच्या संधीसह एआय, ईव्ही (Electric Vehicle), सेमीकंडक्टर व बायोटेक्नॉलॉजी अशा भविष्यकालीन क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध होतील.
उद्योगांचा केंद्रबिंदू
पीसीयू अभ्यास मंडळ सदस्य सचिन इटकर यांनी खेड, तळेगाव, चाकण परिसरात अनेक कोरियन कंपन्या असल्याने हा परिसर उद्योगांचा केंद्रबिंदू बनला असल्याचे नमूद केले. कोरिया फॅसिलिटेशन सेंटरच्या स्थापनेमुळे भारत–कोरिया औद्योगिक सहकार्य अधिक बळकट होईल. डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. सुदीप थेपडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या केंद्रासाठी सल्लागार मंडळची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये – डॉ. दिनेश अमळणकर, अनिल कुमार सिन्हा, चिसुंग अन्ह, हायवॉन ली, हावॉन कु, जे जोंग ली, जे. एच. अन्ह, जोंग मान किम, नागेंद्र कौशिक, रमेश अय्यर, रौनाग पुंगालिया, सचिन सातपुते, संग जुन, सुंगवू बेंजामिन, सुन ह हा पार्क, तेसुंग किम, यंग क्यू ह्वांग, यंग पाक ली यांचा समावेश आहे.
कार्यक्रमास एस बी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या डॉ. किर्ती धारवाडकर, पीसीसीओईआरचे डॉ. हरिश तिवारी, पुणे बिझनेस स्कूलचे डॉ. गणेश राव, एनएमव्हीपीएमचे डॉ. रामचंद्र जहागीरदार, एसबीपीएसच्या डॉ. बिंदू सैनी, विविध विद्या शाखेचे अधिष्ठाता, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कोस्मे, पीसीईटीचे आणि पीसीयूचे अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. तसेच, पीसीयू कोरिया फॅसिलिटेशन सेंटरच्या मुख्य सल्लागार व सीईओ युजिन हान यांचा विशेष गौरव करण्यात आला.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
